साक्री प्रतिनिधी/अकिल शहा
साक्री शहरामधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरती असलेल्या धुळे रस्त्याकडे असणाऱ्या सागर स्विट
( फरसाण )च्या दुकानाला रात्री 11 वाजेच्या सुमारास भिषण आग लागली.
आग कितकी भिषण होती की दुकानातील फर्निचर सह सर्व वस्तु जळुन खाक झालेत. आगीचे कारण शॉर्टसर्किटमुळे असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल तब्बल दोन तास घटनास्थळी उशिराने पाचारण झाल्याने दुकानातील सर्व साहित्यांची प्रचंड प्रमाणात नुकसान झाले . दुकानाच्या दोन्ही बाजूला दवाखाने आहेत. परंतु आग लागल्यानंतर वेळीच दुकानातील सिलेंडर बाहेर काढल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. दुकानाला लागलेल्या आगीत सुमारे दहा ते पंधरा लाखांचे नुकसान झाले आहे अशी माहिती हॉटेलचे मालक नैनाराम चौधरी यांनी दिली .
0 Comments