नंदुरबार/प्रतिनिधी
दिनांक 01/06/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. पी. आर. पाटील यांना त्यांचे मोबाईल क्रमांकावर अज्ञात मोबाईल क्रमांक 09373939113 यावरुन काहीतरी काम असल्याचा 23.00 वा. SMS आला. त्यानी तात्काळ त्यांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहीते यांना मदत करण्यास सांगीतले. त्याअन्वये PSI मोहिते यांनी तात्काळ नमुद मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता, कॉलर यांनी त्यांचे नाव प्रबोध चंद्र सावंत असे सांगून ते खासदार श्री अमोल कोल्हे यांचे PA असलेबाबत कळविले व त्यांचे मतदार संघातील लोकांच्या एका वाहनाचा शहादा येथे अपघात झाला असल्याचे सांगून त्यांना तातडीने मदत करावी म्हणून सांगितले.
तसेच त्यांनी दिलेला मोबाईल क्रमांक 09834395809 यावर PSI मोहिते यांनी तात्काळ संपर्क केला असता सदर कॉलर याने त्याचे नाव रविकांत मधुकर फसाळे असे कळवून त्यांचे बोलेरो वाहनाचा शहादा येथे अपघात होवून 04 लोक मयत झाले असून 07 ते 08 लोक जखमी असुन त्यांचेवर नंदुरबार येथे शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत असे सांगितले. त्याबाबत नियंत्रण कक्ष यानी तातडीची मदत होणेकामी माहिती घेतली असता असा अपघात झाला नसल्याचे समजले. त्यानंतर सदर मोबाईल क्रमांक 09834395809 यांनी पुन्हा PSI मोहिते यांना कॉल करून त्यांना तात्काळ अम्ब्युलन्सने शिवाजीनगर पुणे येथे जाणे असल्याने वाहनात डिझेलसाठी 7,000/- रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगीतले. ही बाब खासदार यांचे PA प्रबोध चंद्र सावंत यांना सांगितली तसेच पोलीस मदत देत असल्याचे सांगितले.
त्यानंतर पुन्हा रविकांत मधुकर फसाळे यांनी PSI मोहिते यांना थोड्या वेळाने पुन्हा कॉल करून सांगितले की, सकाळपासून काहीही खाल्ले नाही उपाशी आहोत, कृपया आम्हाला जेवणासाठी 2000/- रुपयांची मदत करावी, जेणेकरून ते प्रवासादरम्यान काहीतरी जेवण करतील.
PSI मोहिते यानी खासदार यांचे PA प्रबोध चंद्र सावंत यांना विचारले. त्यांनी अपरात्र असल्याने व दूर प्रवास करणे असल्याने तसेच खासदार श्री अमोल कोल्हे यांचा मदत करणेबाबतचा निरोप आहे असे सांगितले. PSI मोहिते यांनी माणूसकीच्या नात्याने कॉलर नाम मोबाईल क्रमांक 09834395809 धारक रविकांत मधुकर फसाळे याचे फोन पे अकाऊंटवर 1,000/- रुपयांची मदत पाठविली.
आज सकाळी दिनांक 02/06/23 रोजी PSI मोहिते यांनी नियंत्रण कक्षामार्फत खात्री केली असता, अशा प्रकारची अपघाताची घटना ही नंदुरबार जिल्हा हद्दीत तसेच आजुबाजुच्या जिल्ह्यात देखील घडलेली नसल्याचे समजले. त्यामुळे अनोळखी मोबाईल क्रमांक 09834395809 धारक रविकांत मधुकर फसाळे यांनी खासदार अमोल कोल्हे यांचे PA प्रबोध चंद्र सावंत यांचे नाव सांगून पोलिसांना अपघाताबाबतची खोटी माहीती देवून पोलिसांची आर्थिक फसवणूक केली तसेच पोलीस खात्याला अपघाताबाबत खोटी माहीती देवून विनाकारण कामाला लावून शासकीय कामकाजाचा वेळ वाया घालवला आहे. याबाबत नंदुरबार शहर पोलिस ठाणे येथे 434/2023 भादवी कलम भा.द.वि. कलम 420, 182 सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66(ड) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0 Comments