Header Ads Widget


अवैधरित्या शहाद्यात विमल गुटखा विक्री करणाऱ्यांवर शहादा पोलिसांची कारवाई....



नंदुरबार/ प्रतिनिधी 

 

महाराष्ट्र राज्यात वाहतूक व विक्री करण्यास प्रतिबंधित असलेला विमल गुटखा व पान मसाला अवैधरित्या शहाद्यात विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघा विमल तस्करांना शहादा पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून चार चाकी वाहनांसह सुमारे 4 लाख 82 हजार रुपयांचा विमल गुटखा जप्त करण्यात आला आहे ही कारवाई काल दि.31 रोजी रात्री दहा वाजता शहादा तळोदा रस्त्यावर ठेंगचे गावानजीक करण्यात आली आहे याप्रकरणी नंदुरबार येथील विशाल मोहनदास जामनानी व सागर मोहनदास जामनानी या दोघा विमल तस्कर सिंधी बंधूंना अटक करण्यात आली आहे.


गेल्या अनेक वर्षापासून राज्यात तंबाखू मिश्रित विमल गुटखा व सुगंधित पान मसाला वाहतूक व विक्री राज्य शासनाने प्रतिबंध केला आहे तरी देखील मध्यप्रदेश व गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात या गुटख्याची तस्करी व विक्री राजरोजपणे सुरू असून सर्रासपणे शहरात विक्री केली जात आहे त्यामुळे गुटखा तस्करांवर कारवाईची मागणी सातत्याने लावून धरली जात आहे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे काल दिनांक 31 रोजी शहरात पुन्हा मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली होती.

 त्यानुसार रात्री दहा वाजता शहादा तळोदा रस्त्यावर ठेंगचे गावानजीक उपनिरीक्षक छगन चव्हाण गुन्हे शोध पथकाचे दिनकर चव्हाण किरण पावरा संदीप लांडगे भरत उगले यांनी सापळा लावला असता त्यांना एम एच 39 ए बी 1960 क्रमांकाची पांढऱ्या रंगाचे चार चाकी वाहन येताना दिसले त्या वाहनास थांबवून तपासणी केली असता प्रतिबंधित तंबाखू मिश्रित विमल गुटखा व पान मसाला असल्याचे दिसून आले. पोलीस पथकाने या वाहनातील सुमारे 2 लाख 82 हजार 480 रुपयाचा विमल गुटखा व 2 लाख किमतीचे चार चाकी वाहन असा सुमारे 4 लाख 82 हजार 480 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून नंदुरबार येथील जुनी सिंधी कॉलनीतील विशाल मोहनदास जामनानी व सागर मोहनदास जामनानी या दोघा विमल तस्करी करणाऱ्या सिंधी बंधूंना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात पोलीस शिपाई दिनकर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून कलम 188, 272, 273, 328 व अन्नसुरक्षा मानके अधिनियम 2006 चे कलम 26,( 2) (4) 30(2) ए प्रमाने गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान पोलीस प्रशासनाची विमल गुटखा तस्करांविरुद्ध धडक कारवाई सुरू असतानाही शहरात अजूनही काही तस्कर छुप्या पद्धतीने तंबाखू मिश्रित विमल गुटका विक्री करीत असल्याने अशा तस्करांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments

|