Header Ads Widget


शहादा येथील जोहरी परिवारातर्फे भागवत सप्ताहचे आयोजन...


प्रतिनिधी /शहादा


    भक्ती दुःख सहन करण्याची ताकद देते. भक्ती करण्यात मोठी ताकद सामावली आहे. भक्ती ही वेगवेगळ्या प्रकारे करता येते . भक्ती सादर करण्याचा एक भाग म्हणजेच भागवत करणे होय असे विवेचन ह भ प खगेंद्र महाराज यांनी डोंगरगाव रोड वर सुरु असलेल्या भागवत कथेतून केले. 
      डोंगरगाव रोडवरील साईबाबा  मंदिर परिसरात जोहरी परिवारातर्फे भागवत सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे . पुढे ते म्हणाले की शरीराची वेदना ही शरीरावर नाहीतर मनावर अवलंबून असते. मनाने जी गोष्ट स्वीकारली की त्याचा त्रास होत नाही . आपल्या शरीरात एखादी लोखंडी सळई ऑपरेशन करून टाकली आहे हे मनाने स्वीकारले की ती लागत नाही. वेदना शरीर स्वीकारत तेव्हा लागत पण मन स्वीकारत तेव्हा लागत नाही. पूजा देहोने नाहीतर मनाने केली पाहिजे . मनाने केलेली पूजा ही ईश्वर प्राप्ती कडे नेते . 
     कृष्णावतार सादर करताना भक्तीमय संगीत सुरू होते व जिवंत देखावा समोर आल्याने संपूर्ण सभामंडप संगीताचा तालावर ठेका घेत नाचत होते परिसरातील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते . राजा व परमेश्वर येताना सांगून व वाजा गाजा करत येतात तस कृष्ण अवतार घेताना त्यांनी कंसाला व संपूर्ण जगाला सांगून आले होते. आजार व मृत्यू कधीच सांगून येत नाही . म्हणून आपले कर्म व कार्य चांगले करत रहा असे विवेचन महाराजानी केले.
      भागवत सप्ताह सांगता 1 जून रोजी सकाळी असून भंडारा प्रसादाचा लाभ घेण्याचे आव्हान आयोजकांकडून करन्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

|