Header Ads Widget


शेवाळी(दा.) जवळ नवीन बायपास मार्गावरती स्विफ्ट कारच्या धडकेत मोटरसायकल चालकाचा दुर्दैव मृत्यू; घटनास्थळावरून कार चालक पसार...


साक्री प्रतिनिधी/अकिल शहा 


  नागपूर -सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरती असलेल्या साक्री शहरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर नवीन बायपास मार्गाचे काम पूर्व पदावर सुरू आहे, काही दिवसांपूर्वी या नवीन बायपास मार्गा वरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे, हा नवीन बायपास वाहनधारकांसाठी डोकेदुखी व तसेच अपघाताला निमंत्रण देत असल्याचे निदर्शनास दिसून येत आहे, असाच एक प्रकार दिनांक १९ रोजी घडला आहे.
      साक्री तालुक्यातील दातर्ती येथील रहिवासी सुकलाल निंबा गवळी (वय५६) चक्करबर्डी, धुळे येथे लाईनमन पदावर कार्यरत होते ते दिनांक १९ मे  रोजी ड्युटी करून आपल्या गावी  दातर्ती येथील घरी आले होते व साक्री येथे कामानिमित्त  मोटरसायकल होंडा यूनिकॉर्न एम.एच १८ बी.एस २५४२ ने सायंकाळी सात वाजता साक्री येथे गेले होते तेथून काम आटोपून नवीन बायपासने परत दातर्ती येथे जात असताना शेवाळी गाव शिवारात समोरून येत असलेल्या पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार क्रमांक एम.एच ०१ बी.एफ ०३३२ ने रात्री ०९:३० वाजेच्या सुमारास धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले घटनेची माहिती नातेवाईकांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळावरील नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात,साक्री येथे दाखल केले असता त्या ठिकाणी असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांनी रात्री १०:४५वाजेच्या सुमारास त्यांना तपासून मृत घोषित केले, घटनेची खबर मृत व्यक्तीचा पुतण्या हिरामण बापू चौधरी यांनी साक्री पोलीस ठाण्यात दिली असून फरार कार चालकाविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास साक्री पोलीस ठाण्याचे ए.एस.आय.अनिल भिंगारे करीत आहे.

Post a Comment

0 Comments

|