Header Ads Widget


जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त जनजागृती सप्ताहाचे आयोजन: श्री.रघुनाथ गावडे (जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी)


नंदुरबार/प्रतिनिधी 

   जागतिक पातळीवर दिनांक २८ मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनाची थिम आम्ही कटीबध्द आहोत ही आहे. या दिनाचे औचित्य साधून दिनांक २२ मे ते २८ मे या कालावधीत जिल्ह्यात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे, अशी माहिती नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  रघुनाथ गावडे यांनी दिली आहे.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत शाश्वत  स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ . सुप्रिया गावित यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत . मासिक पाळी व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक आहे . मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्याबाबत
असलेल्या अज्ञानापोटी निर्माण झालेल्या विविध रूढी-परंपरांमुळे मुली-महिलांना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते.  या पार्श्वभूमीवर या दिनाच्या औचित्य साधून जिल्हयात चर्चासत्रे, प्रशिक्षण, प्रात्यक्षिक आदी उपक्रमाच्या माध्यमातून   जनजागृती करण्यात येणार आहे.

 सप्ताह कालावधीत महिला व किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी दरम्यान स्वच्छता व त्यांचे आरोग्य या बाबींना केंद्रस्थानी ठेवून जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये आरोग्य विभाग, शिक्षण, महिला व बाल कल्याण विभाग, उमेद तसेच विविध घटकांचा समन्वय साधून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. तरी सर्व ग्राम पंचायतीमधून अशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, शिक्षिका, महिला बचत गट यांनी पुढाकार घेवून मोठया प्रमाणत या सप्ताह निमित्त मासिक पाळी व्यवस्थापन व आरोग्याची काळजी या विषयावर महिला व किशोरवयीन मुलींना  माहिती देवून जनजागृती करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

|