Header Ads Widget


नंदुरबार जिल्हा रुग्णालय व आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या संयुक्त विद्यमाने हज यात्रेकरूंचे लसीकरण...



नंदुरबार/प्रतिनिधी

आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळ, जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने हज यात्रेकरूंचे प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.कार्यक्रमात जिल्ह्यातील साधारणता 180 ते 200 यात्रेकरूंचे लसीकरण झाल्याची माहिती देण्यात आली. आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हज यात्रेकरूंचे लसीकरण व सत्कार समारंभाचे आयोजन काल शनिवार दि.20 मे रोजी पालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात करण्यात आले. 
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक परवेज खान यांनी केले. यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी हज यात्रेकरूंच्या सत्कार केला. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,मौलाना हाफिज अब्दुल्ला, मौलाना युसुफ बेगामी, फरीद मिस्तरी, फारुख मेमन, प्रेम सोनार, नबा खाटीक, अबुल हसनात पिरजादे, लियाकत, आरिफ हाफिज, बारीसाब मणियार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक नजमुद्दीन शेख यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक परवेज खान यांनी केले. लसीकरणासाठी जिल्हा रुग्णालय व पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments

Today is Friday, May 23. | 9:29:35 AM