Header Ads Widget


अक्कलकुव्वाचे ठाण्या वाघ आमश्या दादा पाडवी यांचे सोबत विशेष बैठक संपन्न


अक्कलकुव्वाचे ढाण्या वाघ दबंग आमदार आम्श्या दादा पाडवी यांचे सोबत लाईव्ह नेशन न्यूज व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ टीमच्या वतीने विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीत आमशया दादा पाडवी यांची अक्कलकुववा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सत्कार व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आली. 


या विशेष बैठकीत स्थानिक लोकांचे समस्यांवर उपाय योजना अनेक प्रकल्प, शासकीय योजना, विभागातील भ्रष्टाचार, अवैध धंदे करणाऱ्यांवर कार्यवाही विषय, आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित ऐकलेल्या-न ऐकलेल्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली. ही चर्चा बराच वेळ चालली, या चर्चेत अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली, या वेळी इतर अनेक समस्यांवर उपाय सापडले. 


या बैठकीत उपस्तीत मुजम्मिल हुसैन ( संपादक - लाईव्ह नेशन न्यूज, माहिती अधिकार महासंघ राज्य कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र ),  सईद किरेशी ( उपसंपादक - लाईव्ह नेशन न्यूज ) जयेश बागुल (सोनू माळी - लाईव्ह नेशन न्यूज विशेष सहकारी ), याहामोगी ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक हेमंत वळवी, लाईव्ह नेशन न्यूजचे क्राइम रिपोर्टर प्रफुल्ल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|