नंदुरबार/प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे धुळे व नंदुरबार जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी आज नंदुरबार शहरातील शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या स्मारकास अभिवादन करून, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे आयोजित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा पक्षाचा आढावा बैठक व परिचय मेळावा घेतला. यावेळी विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांच्यासह धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख तसेच पक्षाचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केले, मेळाव्यानंतर त्यांनी नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या आगामी काळातील पक्षाची भूमिका, तसेच नंदुरबार जिल्ह्यातील पक्षातील एक प्रमुख नेता पक्षातून बाहेर गेल्यामुळे पक्षाची झालेली झीज भरून काढण्यासाठी नव्याने मोर्चे बांधणी करणे व पक्षाचे संघटन करण्यासाठी, त्यांनी आज नंदुरबार जिल्ह्यात तील अक्कलकव्यापासून पक्षाच्या संघटन कार्यासह नव्या जोमाने सुरुवात केली, तसेच आगामी काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत पुढे सर्वात मोठे आवाहन असणार आहे ते भारतीय जनता पक्षाची विरोधक म्हणून सामना करण्याची भूमिका असणार आहे.
त्या अनुषंगाने आगामी काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची आगामी भूमिका स्पष्ट होणार, तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून 2024 च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत यशाचा काही भाग नंदुरबार जिल्ह्यातून मिळेल असा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला.
त्याचप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्न शेतीमालाला भाव तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत माहिती दिली, यावेळी पत्रकार परिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दीपक गवते, धुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, पंचायत समिती सभापती कैलास पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नंदुरबार महानगर प्रमुख पंडित माळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
0 Comments