नंदुरबार /प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हास्तरीय पदाधिकारी यांची बैठक दिनांक 29 मे 2023 रोजी अक्कलकुवा येथे आयोजित करण्यात आली आहे
नंदुरबार जिल्ह्याचे नवनियुक्त संपर्कप्रमुख माजी आमदार शरद पाटील,महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभांगी पाटील, महिला आघाडीच्या नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख विद्या साळी, विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी आदी या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत यावेळी संपर्कप्रमुख शरद पाटील यांच्या वतीने अक्कलकुवा तालुक्यात नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती व तालुका शेतकरी सहकारी संघ मर्यादीतच्या नवनिर्वाचित संचालकांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या बैठकीत आगामी निवडणुका व पक्षाची ध्येय धोरणे व वाटचाल याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.अक्कलकुवा येथील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्क कार्यालयात सकाळी 11.00 वाजता ही बैठक होणार आहे.तरी बैठकीला जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले यांनी केले आहे.
0 Comments