Header Ads Widget


जि.प.बांधकाम विभाग नंदुरबार यांच्या अंतर्गत पूर्ण न झालेल्या कामात भ्रष्टाचाराची चौकशीचे ठाकरे गटाचे निवेदन ...


नंदुरबार/प्रतिनिधी


नंदुरबार जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत सन 2022  23 या आर्थिक वर्षात आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत रस्ते दुरुस्ती व सुधारणा राज्यस्तर योजनेअंतर्गत लेखाशीर्ष 3054 व 2722 च्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करण्याच्या आदेश पारित करण्याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा उपप्रमुख के.टी गावित यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली असून. निवेदनात नमूद केल्यानुसार, नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत सन 2022- 23 या आर्थिक वर्षात आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत रस्ते दुरुस्ती व सुधारणा राज्यस्तर योजना अंतर्गत, लेखाशीर्ष 3054 व 2722 च्या जिल्हा परिषद बांधकाम विभाग नंदुरबार मार्फत जिल्ह्यात 1293 कामे प्रत्येकी दहा लक्ष रुपये प्रमाणे 72 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत, त्यापैकी नवापूर तालुक्यात 16 कोटी रुपयांची कामे न करता मार्च अखेरीस फायनल कामे झाले असल्याची बिले काढण्यात आली आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यात सुद्धा काही ठिकाणी प्रत्यक्ष कामांचे स्थळ निरीक्षण केले असता कामे न करताच त्यांची सुद्धा मार्चअखेरीस फायनल दिले काढण्याचा प्रताप बांधकाम विभागाने केला आहे, यासंदर्भात माहितीच्या अधिकारात वर्कऑर्डर, रनिंगबिले, जिल्हा गौण खनिज विभागात खडी, गिट्टी, मुरूम, डांबर आदींच्या रॉयल्टी भरलेले व वाहतूक करण्याबाबतचे परवाने काढले असलेल्याच्या त्यांची झेरॉक्स प्रतींवर सही शलकेलेल्याची माहिती मिळवण्याची मागणी केली होती, परंतु सदरची माहिती देण्यात आली नसल्यामुळे, अखेरीस माहिती मिळवण्यासाठी दिनांक 21 मार्च 21 एप्रिल 2023 रोजी आंदोलन केले, आंदोलन करताना जिल्हा परिषद बांधकाम विभाग नंदुरबार यांनी 15 मे 2023 च्या आत माहिती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले, आणि त्या संदर्भातले पत्र सुद्धा जिल्हा परिषद नंदुरबार यांनी 20 एप्रिल 2023 अन्वये दिले असून, याबाबतची माहिती देण्यास विलंब का होत आहे. दिलेल्या कालखंडानुसार जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू असल्याने न झालेल्या कामांची चौकशी करतेवेळी रस्ते पावसात वाहून गेली असे खोटे सबब दाखवून, केलेल्या भ्रष्टाचाराची पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे, कोट्यावधी रुपयांच्या झालेल्या भ्रष्टाचाराची निपक्षातीपणे चौकशी करण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात आली, व त्या समिती विरोधी पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य यांची नियुक्ती करण्यात यावी, तसेच रस्त्यांच्या कामात कुठे कुठे भ्रष्टाचार झालेला आहे, ते प्रत्यक्ष दाखविण्यास तयार असल्यामुळे झालेल्या भ्रष्टाचाराची निपक्ष ते पाणी पारदर्शक चौकशी तक्रारदारांच्या समक्ष करण्याची मागणी केली, त्यानुसार दिनांक 1 मे 2023 या महाराष्ट्र दिनाच्या आत चौकशी समितीचे गठन केले नाही तर, तक्रारदार जिल्ह्याच्या ठिकाणी जाहीर पत्रकार परिषद घेऊन व एक दिवसाचे धरण आंदोलन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर करण्याचे निवेदन दिले, व समस्यांचे निवारण झाले नाही तर पुनश्च नंदुरबार जिल्ह्यातील सुरत नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मागण्या मान्य होईपर्यंत बंद ठेवण्याचे पत्र यावेळी देण्यात आले.याबाबत आज नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा उपप्रमुख यांनी, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे माहिती मागण्यासाठी भेट घेणे गेल्या असता उपलब्ध न झाल्याने, त्यांनी आज आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली, यावेळी नंदुरबार जिल्हा शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा उपप्रमुख केटी गावित, नंदुरबार तालुकाप्रमुख विजय ठाकरे, नंदुरबार महानगर प्रमुख पंडित माळी, युवासेना जिल्हा संघटक अहरोन गावित, विष्णू गावित, योगेश गावित, नंदुरबार शहर अध्यक्ष छोटू चौधरी, नंदुरबार शहर उपाध्यक्ष इम्तियाज कुरेशी आदी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|