Header Ads Widget


"आमदारांची वारी आपल्या दारी" उपक्रमांतर्गत,धडगाव येथे आज जनता दरबारचे आयोजन....

  
धडगाव/प्रतिनिधी 

     "आमदारांची वारी आपल्या दारी" उपक्रमांतर्गत धडगाव तालुक्यातील जनतेचे गाऱ्हाणे आणि तक्रारी सोडविण्यासाठी दिनांक 26 मे रोजी धडगाव येथे जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे.
       विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांच्या संकल्पनेतून आमदारांची वारी आपल्या दारी या उपक्रमांतर्गत सामान्य जनतेच्या प्रलंबित विविध समस्या तात्काळ सोडविण्यासाठी दिनांक 26 मे रोजी धडगाव तहसील कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.
           या बैठकीत तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील काही विभागांचे वरिष्ठ अधिकारी हे आपल्या विभागाचा विकास कामांचा तसेच प्रलंबित कामांचा आढावा सादर करणार असून या जनता दरबारात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या विविध समस्या देखील सोडविण्यात येणार आहेत, तरी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी जनता दरबारात सामील होऊन आपल्या समस्या सोडवुन घ्याव्यात असे आवाहन तहसीलदार किसन गावित यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

|