Header Ads Widget


साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी डॉ. बन्सीलाल बाविस्कर तर उपसभापतीपदी भानुदास गांगुर्डे यांची बिनविरोध निवड...


साक्री प्रतिनिधी/अकिल शहा 
  
साक्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दुसाने ता.साक्री येथील डॉ. बन्सीलाल बाविस्कर तर उपसभापती पदी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, मा.खा.बापूसाहेब चौरे, मा. आ.डी.एस.अहिरे, मा.आ. वसंतराव सूर्यवंशी, धुळे जि.प.कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या नेतृत्वाखाली संचालक पदाच्या 16 जागा पटकावून वर्चस्व मिळवले होते.
 
निवडणूक निर्णय अधिकारी संजय गीते यांच्याकडे सभापती व उपसभापती पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे डॉ. बन्सीलाल वामनराव बाविस्कर व भानुदास रामदास गांगुर्डे यांची अनुक्रमे सभापती, उपसभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी हर्षवर्धन दहिते यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच नवनिर्वाचित संचालक ऋतुराज ठाकरे, नंदकुमार खैरनार, लादुसिंग गिरासे, दीपक साळुंखे, शाहीराम साबळे, प्रा.रवींद्र ठाकरे सौ. जिजाबाई साबळे, कलाबाई बेडसे, वसंत पवार, राजेंद्र शाह, किरण कोठावदे, जितेंद्र बिरारीस, ओंकार राऊत, भास्कर पवार, दिनकर बागुल उपस्थित होते याप्रसंगी सभापती व उपसभापती यांचे सह नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली व साक्री शहरातून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते मा.खा.बापूसाहेब चौरे, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दर्यावगिर महंत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप काकुस्ते, साक्रीचे उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख विशाल देसले, साक्री पंचायत समितीचे सभापती शांताराम कुवर, जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, दीपक भारुडे, विश्वास बागुल  पंचायत समितीचे माजी सभापती संजय ठाकरे, गणपत चौरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य योगेश चौधरी महिर चे सरपंच रमेश सरक दुसाने एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रोहित भदाणे, उद्योजक विजय पंडित ठाकरे, लक्ष्मीकांत शाह, ललित अरुजा, पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे,  भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रदीप नांद्रे, देगावचे सरपंच सुधीर अकलाडे, म्हसदी चे माजी सरपंच कुंदन देवरे, धमनार चे माजी सरपंच दिनेश सोनवणे, मलांजन चे माजी सरपंच ऋषिकेश मराठे, पिंपळनेर चे माजी सरपंच योगेश नेरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गजेंद्र कोतकर, सामोडे चे उपसरपंच सचिन शिंदे, ककाणी ग्रामपंचायतचे गटनेते सचिन बेडसे, आमखेल चे सरपंच ज्ञानेश्वर पवार, म्हसदी ग्रामपंचायत सदस्य किरण देवरे, किरवाडे चे माजी सरपंच देविदास पाटील,

म्हसदी विकासो चे माजी सभापती महेंद्र देवरे, जयेश गुंजाळ, नगरसेवक दीपक वाघ, पंचायत समिती सदस्य ललित सोनवणे, दुसानेचे माजी सरपंच शामराव भदाणे, निजामपूर चे माजी सरपंच सलीम पठाण, युसुफ सय्यद,  सामोडे विकासो चे  चेअरमन रमेश महंत, मुन्ना देवरे, सागर काकुस्ते, प्रवीण देवरे, शिवसेना शहर प्रमुख बंडू गीते, मनिष गीते, अतुल दहिते, बाळा खैरनार, किरण बच्छाव,किशोर काकुस्ते, धनराज गांगुर्डे, संजय साबळे,पंचायत समितीचे माजी सदस्य रावसाहेब घरटे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|