Header Ads Widget


नंदुरबार जिल्ह्यातील प्रा.आ.केंद्र आष्टे येथे राष्र्टीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला....



प्रतिनिधी/नंदुरबार 


     आज दि.16.5.2.23 रोजी प्रा.आ.केंद्र आष्टे येथे राष्र्टीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. राष्र्टीय डेंग्यू दिवसाबद्दल प्रा.आ.केंद्र आष्टे येथील वैद्यकिय अधिकारी डाॅ.योगेश पाटील दादा यांनी डेंग्यू आजाराबद्दल माहिती देवुन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच ठाणेपाडा ऊपकेंद्र येथील आरोग्यसेवक श्री.आनंद जाधव यांनी डासांपासुन पसरणारे आजार, प्रतिबंधात्मक ऊपाययोजना, व ऊपचार याबद्दल तसेच राष्र्टीय डेंग्यु आजाराबद्दल माहीती अधोरेखित केली.डेंगूची लक्षणे, तसेच ग्रामस्थांनी आपल्या घरातील पाण्याचे हौद, पिंप, यांमध्ये जास्त दिवस पाण्याचा साठा करण्यात येवु नये याबद्दल तसेच घरातील फ्रिजच्या पाठिमागचा ट्रे ,ऊन्हाळ्या संपल्यानंतर कुलर मधील पाणी कोरडे करावे. अडगळिचे सामान,नारळ्याच्या करवंट्या, तुटलेल्या कपबश्या, टायर्स यांमध्ये पाणी साचु देवु नये. ग्रामस्थांनी आठवड्यातुन एक दिवस कोरडा पाळावा यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गप्पी मासे यांचे महत्व ग्रामस्थांना व नसिॅंग काॅलेजच्या विद्याथीॅनी यांना समजावुन सांगण्यात आले. तसेच यांसाठी आष्टे येथील आरोग्य सहाय्यक श्री.पटेल नाना, आरोग्य सहाय्यक.श्री.साळुंके नाना, प्र.वै.अधिकारी श्री.जगताप नाना,आरोग्यसेवक श्री.साबळे नाना, श्रीम.महाले सिस्टर,नसिॅंग काॅलेजच्या विद्याथीॅनी हजर होत्या , अशाप्रकारे राष्ट्रीय डेंग्यू दिवस करण्यात आला. 

Post a Comment

0 Comments

|