शहादा/ प्रतिनिधी
शहादा न्यायालयाच्या आवारात पोलिसांच्या डोळ्या समोर गंभीर गुन्ह्यातील आरोपी नातेवाईकांच्या मदतीने फरार झाल्या प्रकारणी शहादा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप सहदेव आराक, हवालदार राजेंद्र देविदास पारोळेकर व पोलीस शिपाई योगेश संजय सोनवणे या तिघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख पी.आर.पाटील यांनी बजावले आहे.
या घटनेची पार्श्वभूमी अशी, सपोनि. संदिप सहदेव आराक यांचे कडेस तपासावर असलेला गुरनं. ८०७/२०२२ भादंविक, ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी ओम प्रकाश ऊर्फ ओमाराम किसनाराम लेघा जात जाट रा.सियोली कि ढानी, भोजापुर बायतु जिल्हा बाडमेर राज्य राजस्थान याची दिनांक ०८.०५.२०२३ रोजी पोलीस कस्टडी रिमांड मुदत संपत असल्याने त्यास प्रथमवर्ग न्यायालात १४ दिवस न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजुर होणे बाबत न्यायालयात हजर करण्यासाठी असई. पारोळेकर व सोनवणे यांचेसह हजर करून मा.न्यायालयाने आरोपी याची न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजुर केल्याने त्यास असई. पारोळेकर व पोशि. सोनवणे हे कोर्ट आवारात बेडी लावीत असतांना आरोपीने त्यांच्या हातास झटका देवून साक्षीदाराशी झटापटी करून जोरात लाथाबुक्यांनी मारुन खाली पाडुन पोशि. १४०२ सोनवणे यांचे पायाला व हाताला जबर दुखापत करून जखमी करुन शासकीय कामात अडथळा करत विना क्रमांकाचे स्कॉर्पिओतील इसमांशी संगनमताने पुर्व नियोजित कट करुन मा.न्यायालय आवारातून स्कॉर्पिओ वाहनातुन कायदेशिर रखवालीतून पळुन गेला .
सदर घटना घडल्यानंतर फरार आरोपीच्या तपासासाठी पोलिसांनी मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थान यातील राज्यात पोलिसांची पथके पाठवली मात्र, तो सापडला नाही या घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रमुख पी.आर.पाटील यांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख यांनी शहादा पोलीस स्टेशन व शहादा न्यायालयाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. या संपूर्ण प्रकारात चौकशी दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक आराक यांनी अत्यंत गंभीर कसुरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीस न्यायालयात हजर करतेवेळी बेडी लावण्याची परवानगी येणे अपेक्षित असतांना सेवा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केला. अटक आरोपीस राजस्थान न्यायालय येथून ट्रान्सफर वॉरन्ट वरती ताब्यात घेवून शहादा पोलीस स्टेशन कडील गुन्हयात अटक केलेली असल्याने त्यास शहादा पोलीस स्टेशनकडुन पुन्हा राजस्थान राज्यातील कारागृहात सोडावयाचे आहे. हे माहिती असतांना देखील आरोपीस न्यायालयात हजर करतेवेळी स्वतः तपासी अंमलदार म्हणून न्यायालयात हजर राहणे आवश्यक असतांना ते गैरहजर राहिले.
चौकशी दरम्यान नोंदविले जबाब व पोलीस स्टेशनला असलेल्या सी.सी.टी.व्ही फुटेज मधे सपोनि संदिप आराक यांचे सांगणेवरून आरोपीचे नातेवाईक पोलीस स्टेशनला येवून आरोपी लॉकअप मधे असतांना त्याचेशी संभाषण करतांना तसेच सपोनि संदिप आराक यांचेशी संभाषण करित असल्याचे दिसुन येत आहे, त्यावरून आरोपीचे नातेवाईकांचा पोलीस स्टेशनला मुक्त संचार होत असतांना दिसत आहे. यावरुन सपोनि संदिप आराक यांनी संगनमत करून पळुन जाणेस वाव दिल्याचे दिसुन येत आहे.आरोपी यास न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजुर झाले नंतर संबंधित पोलीस अंमलदार यांनी आरोपीस बेडी लावतांना बेसावध राहिल्याने त्याचा आरोपीने पुरेपुर फायदा घेवुन त्यास पळुन जाणेस वाव मिळाला आहे. आरोपी हा सराईत असल्याचे माहिती असून देखील आरोपी अटक केले पासुन ते न्यायालयात हजर करे पावेतो घ्यावयाचा काळजी संदर्भात सर्वोच् न्यायालय तसेच वरिष्ट कार्यालयाकडुन निर्गमित करण्यात आलेल्या सुचनां कडे दुर्लक्ष करून कर्तव्यात अत्यंत हलगर्जीपणा व निष्काळजीपणाचे वर्तन केले असून सदरची बाब अत्यंत गंभीर असून त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम क्रमांक ३ चे उल्लंघन केले आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख पी.आर.पाटील यांचे केलेल्या चौकशी शहादा पोलीस ठाण्यातील कर्मचारी दोषी आढळून आल्याने जिल्हा पोलीस प्रमुखानी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप सहदेव आराक, यांचे निलंबन मुख्यालय हे पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार येथे राहील, त्यांनी पोलीस उप अधिक्षक (मुख्यालय) नंदुरबार यांचेकडेस दररोज हजेरी नोंदवावी. तसेच असई राजेंद्र देविदास पारोळेकर व पोशि. योगेश संजय सोनवणे, यांचे निलंबन मुख्यालय हे पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथे राहील. त्यांनी रा.पो.नि.पो.मु.नंदुरबार यांचेकडेस दररोज हजेरी नोंदवावी. त्यांना पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) नंदुरबार यांच्या लेखी पुर्वअनुमती शिवाय नंदुरबार येथून अन्यत्र जाता येणार नाही. असे आदेश दिले आहे
0 Comments