Header Ads Widget


नंदुरबार पोलीसांनी रोखला नागसर येथील बालविवाह,बालविवाह रोखतांना शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या तिघांना केले अटक...



नंदूरबार /प्रतिनिधी ; सईद कुरेशी 

     चाईल्ड लाईन संस्थेमार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांना,12 मे 2023 रोजी माहिती मिळाली की, नंदुरबार तालुक्यातील नागसर येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह दिनांक 12 मे 2023 रोजी होणार आहे ,अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना सांगितली. तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांनी पत्राद्वारे देखील पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे माहिती अवगत केली होती. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी सदरची माहिती नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार व जिल्हा स्तरीय अक्षता समितीचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे यांना कळवून सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करुन कायदेशीर तरतुंदींबाबत मार्गदर्शन करणेबाबत आदेशीत केले. जिल्हा स्तरीय अक्षता समितीचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे, पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलचे सदस्य, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सुरेश सोनवणे व त्यांचे पथक तसेच जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाचे सरंक्षण अधिकारी गौतम वाघ, समुपदेशक गौरव पाटील यांनी नागसर येथे जावून बालविवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीची माहिती काढली असता नागसर गावात एका ठिकाणी लग्नाच्या कार्यक्रमाची तयारी सुरु असल्याचे दिसून आले. म्हणून तेथे हजर असलेल्या नातेवाईकांकडे वधू मुलगी व वर मुलाच्या जन्म तारखेबाबत विचारपूस करुन असता मुलीचे वय 17 वर्षे 3 महिने व मुलाचे वय 20 वर्षे 11 महिने असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अक्षता समितीने तेथे हजर असलेल्या अल्पवयीन मुलीच्या पालकांसोबत चर्चा केली. त्यानंतर जिल्हा स्तरीय अक्षता समितीचे सदस्य, पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलचे सदस्य, तसेच जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाचे सरंक्षण अधिकारी यांनी अल्पवयीन मुलगी व मुलाच्या पालकांना व नातेवाईकांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन त्यांचे मनपरिवर्तन केले. सदर अल्पवयीन मुलगीला बाल कल्याण समिती, नंदुरबार येथे हजर करणेकरीता घेवून जात असतांना लग्नाकरीता उपस्थित असलेले गावातील नागरिक तसेच पंचायत समिती सदस्य तेजमल रमेश पवार, मुलाचे वडील पिंट्या रोहिदास चव्हाण दोन्ही रा. बद्रीझिरा ता.नंदुरबार व कनिलाल रजेसिंग पवार रा. नागसर ता. नंदुरबार यांनी अल्पवयीन मुलीस बाल कल्याण समितीकडे घेवून जाण्यास नकार देवून पोलीसांशी हुज्जतबाजी करुन पोलीसांच्या अंगावर धावून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. जिल्हा स्तरीय अक्षता समितीचे सदस्य, पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलचे सदस्य, तसेच जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाचे सरंक्षण अधिकारी हे त्यांचे शासकीय कर्तव्य करीत असतांना मुलाचे वडील व लग्नाकरीता उपस्थित असलेले गावातील नागरिक तसेच पंचायत समिती सदस्य तेजमल रमेश पवार, मुलाचे वडील पिंट्या रोहिदास चव्हाण दोन्ही रा. बद्रीझिरा ता. नंदुरबार व कनिलाल रजेसिंग पवार रा. नागसर ता. नंदुरबार यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून त्यांचेविरुध्द् नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 164/2023 भा.द.वि. कलम 353, 332, 143, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, जिल्हा स्तरीय अक्षता समितीचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सुरेश सोनवणे, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाचे सरंक्षण अधिकारी गौतम वाघ, समुपदेशक गौरव पाटील अशांनी केली आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, बालकांचा विवाह करणे हा कायदेशीर गुन्हा असून तो करणाऱ्या व्यक्तीवर तसेच विवाहात हजर असणाऱ्या वऱ्हाडी, बँड पथक, विवाह लावणारे भटजी, आचारी, मंडप डेकोरेटर्स यांचेवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बालविवाह रोखण्यासाठी आलेल्या पोलीस पथक तसेच इतर शासकीय यंत्रणा यांच्या कामात अडथळा आणणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही. 
        श्री.पी.आर.पाटील (पोलीस अधीक्षक, नंदुरबार)

Post a Comment

0 Comments

|