Header Ads Widget


सा. बां. विभाग निफाडचा हालगर्जीपणा चार रस्त्याच्या बाजूला, उघड्या नाल्यामुळे अपघाताचा धोका वाढला, निवेदन सादर ,15 दिवसात दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा....

 
     
   नाशिक प्रतिनिधी :-  डॉ. शेरूभाई मोमीन

         लासलगाव ता. निफाड येथील पोलीस चौकी समोरील लालाजी भेळ भत्ते वाले, यांच्या दुकाना शेजारी  लगत नाल्याला झाकण ढापा बसविण्यात आले नसल्यामुळे  एवढ्या उघड्या नाल्यात पडून मोठ्या प्रमाणात अपघाताचा धोका निर्माण झालेला असून गेल्या काही दिवसापूर्वी या नाल्यांमध्ये एक लहान मुलगा पडला होता त्याला मोठ्या प्रमाणात इजा झालेली होती, अनेक अपघात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, तरी सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित अधिकारी निफाड व नाशिक यांचा हालगर्जीपणा मनमानी भ्रष्टाचारी कारभार  प्रलंबित कामांमध्ये सतत, होणारी, दिरंगाई व. नागरिकांना उडवा - उडवी ची उत्तरे, यास तात्काळपणे पाय बंद घालण्यात यावा असे,  निवेदन स्वाभिमानी सेना,  महाराष्ट्र मुस्लिम महासंघ,          अन्याय - भ्रष्टाचार निवारण जनहीत समिती, लोकशाही मराठी पत्रकार संघ, यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी, नाशिक यांच्या कडे निवेदन सादर करण्यात आलेले, आहेत, सदर त्या, उघड्या, खड्ड्याच्या ठिकाणी तातडीने ढापा बसून कामास त्वरित गती द्यावी निकृष्ट दरजाच्या कामांची सखोल चौकशी करून सदर संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे.व परवाना रद्द करावा, अशी मागणी, या परिसरातील, सर्वच संतप्त,  नागरिकांसह, लोकशाही मराठी पत्रकार संघ,  स्वाभिमानी सेना, नाशिक जिल्हाध्यक्ष,  जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांनी एका निवेदनाद्वारे  केलेली आहेत.अन्यथा, भारतीय संविधानिक लोकशाही मार्गाने, बेमुदत आमरण उपोषणास बसनार आहेत..

Post a Comment

0 Comments

Today is Monday, April 14. | 2:30:50 PM