प्रतिनिधी /अकील शहा
साक्री तालुक्यातील शेवाळी(दा.) येथील ग्रामदैवत येडू माय मातेच्या यात्रोत्सवाला आज दिनांक 11 एप्रिल रोजी प्रारंभ होत आहे. यात्रेनिमित्त विविध प्रकारच्या खेळण्यांची दुकाने ,पाळणे, कटलरी, वस्तू व संसारोपयोगी वस्तूसह हॉटेल्स व पूजेचे साहित्य विक्रेत्यांची दुकाने, विविध शितपेयांची(रसवंती) दुकाने येथे थाटले आहेत, बाहेरगावी( मुंबई नाशिक पुणे धुळे )वास्तव्यास असलेले स्थानिक नागरिक यात्रेनिमित्त गावी हजेरी लावतात त्यामुळे मातेच्या दर्शनासाठी दिवसभर गर्दी असते .
यात्रेत संध्याकाळी तगतरावाची मिरवणूक करण्यात येते,यात्रेनिमित्त सुनंदा कोचुरे(धुळेकर)यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रा उत्सवासाठी ग्राम सुधार मंडळ ,पोलीस पाटील ,तंटामुक्त समिती, ग्रामपंचायतचे सरपंच व तसेच सदस्य , शेतकरी संघटना,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व तसेच संचालक ,सभासद तसेच ग्रामस्थांसह तरुणांनी संयोजन केले आहे. यात्रेत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
0 Comments