Header Ads Widget


आरटीओ ठाणे येथील एजंट खाजगी इसम यांना लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी केली अटक.

ठाणे, दि. १४/०३/२०२३.

दिनांक 10/03/2023 रोजी आलोसे श्री कामरान फैजुद्दीन शेख वय 49 वर्षे आरटीओ एजंट खाजगी इसम यांना तक्रारदार यांचेकडून 1300/- रूपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी अटक केली आहे थोडक्यात हकिकत खालीलप्रमाणे.

यातील तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीत दुचाकी लर्निंग लायसन्स काढून देण्याकरिता शासकीय फी 201/- रुपये असताना तक्रारदार यांच्याकडून आरटीओ एजंट खाजगी इसम मागणी केल्याबाबतची तक्रारदार यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 09/03/2023 रोजी केलेल्या पडताळणी कारवाईत आरटीओ एजंट यांनी तक्रारदार यांचे लर्निंग लायसन्स काढून देण्याकरिता तक्रार यांच्याकडे तडजोडीअंती 2800/- रू लाचेची मागणी करून त्यापैकी 1300/- रुपये दि. 09/03/2023 रोजी व उर्वरित १५०० रुपये तीस दिवसानंतर अशी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबी ठाणे युनिटने सापळ्याचे आयोजन करून दिनांक 09/03/2023 रोजी आरटीओ एजंट कामरान फैजुद्दीन शेख यांना तक्रार यांच्याकडून 1300/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, श्री सुनिल लोखंडे लाप्रवि ठाणे परिक्षेत्र ठाणे तसेच अपर पोलीस अधीक्षक, श्री. अनिल घेरडीकर लाप्रवि ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली अधिकारी श्रीमती.पल्लवी ढगे-पाटील, पोलीस निरीक्षक अेसीबी ठाणे, पोहवा/कोळी, पोहवा/लोटेकर व पोहवा/पोटे अँटी करप्शन ब्युरो ठाणे 

Post a Comment

0 Comments

|