Header Ads Widget


उप कार्यकारी अभियंता यांना लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांनी केली अटक.

रत्नागिरी, दि. १४/०३/२०२३.


दिनांक 10/03/2023 रोजी आलोसे श्री. अमोल मनोहर विंचुरकर वय 40 वर्षे उप कार्यकारी अभियंता महावितरण उप विभाग दापोली – 2 जि रत्नागिरी (वर्ग – 2) यांना तक्रारदार यांचेकडून 50,000/- रूपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी अटक केली आहे थोडक्यात हकिकत खालीलप्रमाणे.

यातील तक्रार हे इलेक्ट्रिक ठेकेदार असून त्यांचे पक्षकार यांनी मौजे टाळसूरे येथे प्लांटिंग केलेले असून सदर जागेमध्ये 110 केवी वीज भार व ट्रान्सफॉर्मर बसवण्याकरिता व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या इस्टिमेटला मंजुरी देऊन तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्याकरिता लोकसेवक श्री अमोल मनोहर विंचुरकर उप कार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग दापोली 2 यांनी तक्रारदार यांचेकडे 80 हजार रुपये लाच रकमेची मागणी करून मागणी केलेल्या लाच रकमेपैकी 50,000/- लाचेची रक्कम तक्रारदार यांचेकडून कार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग दापोली -2 यांचे कार्यालय येथे पंचा समक्ष स्वीकारल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.

सदर लाचेची सापळा कारवाई पोलीस अधीक्षक, श्री सुनिल लोखंडे लाप्रवि ठाणे परिक्षेत्र ठाणे तसेच अपर पोलीस अधीक्षक, श्री. अनिल घेरडीकर लाप्रवि ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्री. अनंत कांबळे पोलीस निरीक्षक, अेसीबी रत्नागिरी, पोहवा/संतोश कोळेकर, पोना/दिपक आंबेकर, पोशि/हेमंत पवार व चापोशि/प्रशांत कांबळे अँटी करप्शन ब्युरो रत्नागिरी यांनी यशस्वीरित्या सापळा कारवाई केलेली आहे.

Post a Comment

0 Comments

|