नंदुरबार /प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर (तलावपाडा ) या ग्रामपंचायतीला आर. आर. (आबा )पाटील 'सुंदर गाव' अभियानात नंदुरबार जिल्हा परिषदेकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. सन 2021- 22 या वर्षात जिल्हास्तरीय स्तरावरून
आर. आर. (आबा) पाटील 'सुंदर गाव' अभियान राबविण्यात आले होते या स्पर्धेत असलेल्या सहा ग्रामपंचायतीची तपासणी करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. तपासणी समितीने दिलेल्या गुणांकनाआधारे हि निवड करण्यात आली आहे.
आर. आर. (आबा) पाटिल या स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील एक एक ग्रामपंचायत निवडण्यात आले होते. 1) श्रीरामपूर- नंदुरबार 2)लहान कळवान- नवापूर 3)डोंगरगाव- शहादा 4) रेवानगर- तळोदा 5)भगदरी- अक्कलकुवा 6) सिसा- धडगाव अशा ग्रामपंचायती स्पर्धेत होत्या.आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव 2021- 22 अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतची जिल्हास्तरीय समितीने तपासणी केली होती.
यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील सदस्य समितीने या ग्रामपंचायतीची तपासणी केली होती. समितीने विस्तार शाळा, अंगणवाडी, सखी प्रेरणा भवन, हॅन्ड वॉश स्टेशन, फुलपाखरू गार्डन, पिण्याचे पाण्याचे स्त्रोत, गोबर गॅस, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, स्मशानभूमीत व समोरील जागेवर वृक्ष लागवड अशा अधिक कामांची पाहणी केली असता, यातून श्रीरामपूर (तलावपाडा) ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचे निवड करून पारितोषिक जाहीर केले आहे. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, राजेंद्र एम. पाटील, गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी सर्व श्रीरामपूर (तलावपाडा) ग्रामपंचायत यांची 'सुंदर गाव'या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सर्व सदस्य व ग्रामस्थांचे कौतुक केले जात आहे. व भविष्यात पुढील स्पर्धांमध्ये सहभागी होऊन वेगवेगळ्या स्तरावर यशस्वी होणे व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
0 Comments