Header Ads Widget


दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल भालेरवासीयांकडून जिल्हा पोलीसांचा नागरी सत्कार..!!


श्री. सुनिल गंगाराम पाटील व त्यांचा भाऊ हसंराज दगाजी पाटील दोन्ही रा- भालेर  ता जि- नंदुरबार हे दोन्ही शेतकरी त्यांचा कापुस गुजरात राज्यातील कडी येथे विकुन दिनांक 10/03/2023 रोजीच्या रात्री 01.30 वा. सुमारास दुचाकीने त्यांच्या घरी जात असतांना नंदुरबार शहरातील भालेर रोडचे होळ गावाकडे जाणाऱ्या फाटयाजवळ त्यांच्या गाडीच्या पुढे एक पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहनातून आलेल्या चार अनोळखी अनोळखी इसमांनी त्यांच्या दुचाकीसमोर पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन आडवे लावून फिर्यादी व साक्षीदार यांच्या दिशेने मिरचीपूड भिरकावून 13 लाख 94 हजार रुपये रोख रक्कम बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने हिसकावून घेतले म्हणून श्री. सुनिल गंगाराम पाटील वय- 54 धंदा - शेती रा-  भालेर  ता जि- नंदुरबार  यांचे फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 169/2023 भा.द.वि. कलम 394,34 सह आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे दिनांक 10/03/2023 रोजी 08.04 वाजता अज्ञात आरोपीतांविरुध्द् गुन्हा दाखल आहे. 


नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर व त्यांच्या पथकाने 30 तासात आरोपी नामे 1) उमेश आत्माराम पाटील वय-42 रा. जुनवणे ता.जि. धुळे 2) चैत्राम ऊर्फ झेंडु राजधर पाटील वय- 41 3) सागर ऊर्फ बंटी सुभाष पाटील वय-24 4) दिपक ऊर्फ बबलू सुभाष पाटील वय-26 तिन्ही रा. धामणगांव ता.जि. धुळे 5) राहुल बळीराम भोई वय-25 रा. शिरुड ता.जि. धुळे यांना धुळे येथून ताब्यात घेतले होते. तसेच त्यांचेकडून 13 लाख 26 हजार 540 रुपये रोख, 25 हजार रुपये किमतीचे एक लोखंडी बनावटीचे पिस्तुल, 1200 रुपये किमतीचे चार जिवंत काडतूस, 200 रुपये किमतीचा एक लोखंडी धारदार चाकू, 50 हजार रुपये किमतीचे 05 विविध कंपनीचे मोबाईल व गुन्हा करतेवेळी वापरलेले 7 लाख रुपये किमतीचे वाहन, असा एकुण 21 लाख 02 हजार 940 रुपये किमतीचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे.    


नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी यांचे ग्रामपंचायत चौक, भालेर येथे आगमन झाल्यावर भारतीय पंरपरा व रितीरिवाजाप्रमाणे त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर भालेर, तिशी, नगांव यांचेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पारंपारीक वाद्यांच्या गजरात स्वागत करुन त्यांची मिरवणूक काढली. मिरवणूकीत मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष, नागरिक, विद्यार्थी सहभागी होते. गावातील विद्यार्थीनींनी यावेळी मिरवणूकीत  लेझीम नृत्य सादर केले. तसेच दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

भालेर येथील श्री. सुनिल गंगाराम पाटील व त्यांचा भाऊ हसंराज दगाजी पाटील यांच्या दिशेने मिरचीपूड भिरकावून 13 लाख 94 हजार रुपये रोख रक्कम बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने हिसकावून घेवून जाणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीतांना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार खेडकर व त्यांच्या पथकाने ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणला म्हणून दिनांक 13/03/2023 रोजी भालेर, तिशी, नगांव यांचेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांचा शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी सदर कार्यक्रमाच्यावेळी सांगितले की, ज्या दोन्ही लोकांकडून पैसे हिसकावून घेतले होते ते दोन्ही शेतकरी असून वर्षभर त्यांनी शेतात राबून, घाम गाळून, कष्ट करुन वर्षभराची कमाई अशी एका क्षणात कोणीतरी बळजबरीने हिसकावून घेतल्याने सर्व प्रथम मन व्यथीत झाले होते. गुन्हे घडत राहतात आणि त्यांचा शोधही लागत राहातो, परंतु काही गुन्ह्यांची उकल होणे गरजेचे आहे, याचे एक नैतिक दडपण मी सुध्दा् सामान्य शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे माझ्या मनावर निश्चित होते. त्यामुळे सहकाऱ्यांशी तपासाबाबत चर्चा करुन त्यांना गुन्हा उघडकीस आणणे का महत्वाचे आहे ? हे पटवून दिले होते.  

तपासाबाबत दिलेल्या सुचना, मार्गदर्शन हे जरी त्यांचे आणि अपर पोलीस अधीक्षकांचे असले तरी प्रत्यक्ष तपासात ठिकठिकाणी जावून सी.सी.टी.व्ही. पाहणाऱ्या, माहिती गोळा करणाऱ्या त्यांचे सहकारी अधिकारी व अंमलदारांचे हे यश आहे. या सर्व यशाचे खरे शिल्पकार त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे आहे. पोलीसांकडून जाणते अजाणतेपणी चुका घडल्यावर विविध समाज माध्यमांवर म्हणा किंवा समाजात देखील त्यांना टिकेचे धनी व्हावे लागते, परंतु पोलीसांकडून चांगले काम झाल्यावर त्यांच्या कामाचे कौतूक करणारे खूप कमी लोकं असतात असे प्रतिपादन करुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा नागरी सत्कार आयोजीत करणाऱ्या भालेर, तिशी, नगांव, बलदाने-जुन मोहिदा, ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. 

तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांचे नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दल करत असलेल्या कामगिरीबद्दल कार्यक्रमाला उपस्थित नंदुरबार नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच नंदुरबार पोलीसांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

सदर कार्यक्रमाला नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील व अधिकारी अंमलदार तसेच भालेर ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. शोभाबाई प्रल्हाद पाटील, उपसरपंच श्री. गजानन भिका पाटील, नगांव गावाचे सरपंच सौ.रत्नाबाई अधिकार धनगर, तिशी गावाचे सरपंच श्री. दिलीप पोपट पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|