Header Ads Widget


ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी. ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी एजाज बागवान यांची दुसर्‍यांदा नियुक्ती


नंदुरबार- ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी. ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी एजाज अहमद बागवान यांची दुसर्‍यांदा फेर नियुक्ती करण्यात आली आहे.


एजाज बागवान यांच्या सामाजिक कार्याची दखल ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी. ऑर्गनायझेशनने घेतली आहे. ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांनी एजाज बागवान यांची ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी. ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी दुसर्‍यांदा नियुक्ती केली आहे. 


मुंबई येथील ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी. ऑर्गनायझेशन ट्रस्ट कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांनी एजाज बागवान यांना नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र दिले. याप्रसंगी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय प्रवक्ता कयुम मिर्झा, महाराष्ट्र सचिव इस्हाक खडके, ऑल इंडिया युथ ओबीसीचे अध्यक्ष गुफरान अन्सारी आदी उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा विभागांतर्गत ऑर्गनायझेशनचे काम करुन संघटन मजबुत करण्यास सांगितले. या नियुक्तीबद्दल एजाज बागवान यांचे सर्वच स्तरावरुन कौतूक होत आहे.

Post a Comment

0 Comments

Today is Wednesday, May 28. | 8:22:35 AM