Header Ads Widget


संजय गांधी निराधार योजना ,श्रावणबाळ वृध्दापकाळात निवृत्त वेतन योजना मिळण्याची मागणी- गणेश खर्डे.

नंदुरबार/प्रतिनीधी

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृद्धापकाळ निवृत्त वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील माहे ऑक्टोबर, 2022 ते फेब्रुवारी, 2023 या महिन्याचे अनुदान मिळणेबाबत असी मागणी गणेश खर्डे मलगाव उपाध्यक्ष-पुणे जिल्हा तथा कार्याध्यक्ष-नंदुरबार जिल्हा- बिरसा फायटर्स महा,राज्य व राज्य उपाध्यक्ष- जय रावण प्रतिष्ठान महा,राज्य यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धा काळजी योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजना अंतर्गत  महिना १०००/- रूपये अनुदान देण्यात येते.
सप्टेंबर २०२२ महिन्याचे अनुदान सर्व लाभार्थ्यांच्या नावे जमा झालेले आहे. परंतु वरील सर्व योजने मधील ऑक्टोबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ महिन्याचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही आहे,तरी या पत्राव्दारे आम्ही आपणास विनंती करतो की सदर राहिलेल्या महिन्यांचे अनुदान त्वरीत लाभार्थ्यांच्या खात्या मध्ये फरका सहित जमा करण्यात यावे सदर अनुदानावरच सर्व लाभार्थ्यांच्या चारीतार्थ चालत असल्यामुळे राहिलेल्या महिन्यांचे अनुदान जमा न झाल्यामुळे त्यांचे उदरनिर्वाह चालविण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत,महाराष्ट्र शासन राज्यातील गरीब नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते. त्यापैकी वरील सर्व योजना या योजनाचे अंतर्गत महाराष्ट्र शासन आर्थिक सहाय्य्य केले जाते जेणेकरून त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी व दैनंदिन गरजांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तरी आपण यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून फरका सहित अनुदान त्यांच्या खात्यात जमा करून द्यावे हि विनंती.म्हणून जनहिताच्या दृष्टीने आपणाकडे सर्व लाभार्थी वतीने सूचनावजा निवेदन ईमेल द्वारे पाठवित आहे आपली काम करण्याची पद्धत जनहितार्थ असल्या कारणाने सदर विषयांकित विनंतीचा आपण गभीर्याने विचार करून योग्य असा निर्णय घ्याल अशी मी आशा बाळगतो.तसेच वरील सूचनेवर आपल्या विभागाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाची व कार्यवाहीची माहिती आम्हाला ईमेल द्वारे अथवा पत्राद्वारे कळविण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स महा,राज्य यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|