Header Ads Widget


मुख्यमंत्र्यांना निवेदन ; विधानसभा समोरही शिक्षक सुशिलकुमार पावरांचे 436 वे उपोषण...

रत्नागिरी/ प्रतिनीधी 
जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे दिनांक 9 मार्च रोजी   सकाळी 11 वाजता 436 वे उपोषण मंत्रालयासमोर व दुपारी 2 वाजता विधानसभेसमोर उपोषण आहे. उपोषणाचे निवेदन सुशिलकुमार पावरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.दोषी,भ्रष्टाचारी,षडयंत्रकारी, बोगस अपंग प्रमाणपत्रधारक  विजय दाजी बाईत व बोगस डिग्रीधारक नंदलाल कचरू शिंदे या दोन  शिक्षण विस्तार अधिका-यांना व 31  दोषारोपित तत्कालीन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना  सेवेतून बडतर्फ करा,माझी 2 मुळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा,अशा 28 मागण्यांसाठी शिक्षक सुशिलकुमार पावरा हे उपोषण करीत आहेत. 
             निवेदनात म्हटले आहे की, विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली हे जिल्हा बदली शिक्षकांकडून प्रत्येकी 22,000/ रूपये घेणे,कामाच्या बदल्यात आर्थिक मागणी करणे,स्वत:कुठल्याही प्रकारे अपंग नसून खोटे अपंग प्रमाणपत्र मिळवून अनेक शासकीय योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करणे, षडयंत्र प्रकरणात स्वत:ला वाचविण्यासाठी आदिवासी शिक्षकांकडून स्वत लिहून ठेवलेल्या पत्रावर व बान्ड पेपरवर जबरदस्तीने दमदाटी करून सह्या करवून घेणे,जाणीवपूर्वक शिक्षकांचा पगार न काढणे इत्यादीं गंभीर  प्रकरणात दोषी ठरले आहेत. तसा चौकशी अहवाल मा.गटविकास अधिकारी दापोली, मा.गटविकास अधिकारी गुहागर, मा.शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या त्रिसमीतीय सदस्य समितीने दिनांक 04/10/2018 रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सादर केलेला आहे. त्यांच्या विरोधातल्या दिनांक 04/07/2018 व दिनांक 29/10/2018 रोजीच्या दोन्ही चौकशीत चौकशी समितीने विजय दाजी बाईत यांना दोषी ठरवले आहे. विजय दाजी बाईत यांच्या विरोधातल्या 04/07/2018 रोजीच्या चौकशीच्या अनुषंगाने अरुण कदम माजी जिल्हा परिषद सदस्य, राजकीय पदाधिकारी,रामदास कदम माजी मंत्री , समाजकंटक,पालकामार्फत विजय दाजी बाईत यांनी माझ्या विरोधात मोठे षडयंत्र रचून बनावट व खोट्या गुन्ह्यात अडकवले.बनावट प्रकरण पोलिस चौकशीत व बातम्यांद्वारे उघडकीस आले आहे.दोषी व षडयंत्रकारी विजय बाईत यांना वाचविण्यासाठी अण्णा कदम हे नेहमीच मदत करतात व षडयंत्रात शामिल असल्याचे कबूल करतात. माझ्यासारख्या निरपराध व्यक्तींवर खोटे व बनावट गुन्ह्यात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे महापाप हे करीत आहेत. अशा पापी व षडयंत्री आरोपींस कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.
एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या वर सुद्धा 31 प्रकारचे गंभीर दोषारोप आहे.तसेच नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची आग्रा विद्यापिठाची डिग्री शिक्षण विस्तार अधिकारी पदाधिकारी अवैद्य ठरविण्यात आली आहे. तसा चौकशी अहवाल तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांनी दिलेला आहे. तसेच नंदलाल शिंदे हे महिला कर्मचा-यांचा छळ करणे,अनेक शिक्षकांना त्रास देणे व बोगस डिग्रीत दोषी ठरले असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
           माजी मंत्री रामदास कदम व त्यांचे भाऊ अण्णा कदम यांनी विजय बाईत या दोषी , भ्रष्ट, बोगस प्रमाणपत्र धारक शिक्षण विस्तार अधिका-याला कारवाई पासून वाचविण्यासाठी माझ्या विरोधात षडयंत्र रचून माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कटकारस्थान केले आहे,असा शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आरोप केला आहे.

Post a Comment

0 Comments

Today is Monday, April 14. | 7:44:27 AM