Header Ads Widget


पश्चिम रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवांशासाठी अनेक रेल्वेगाडया रद्द...

      नंदुरबार /प्रतिनीधी 

    पश्चिम रेल्वेच्या  गुजरात  राज्यातील रेल्वे स्थानकावरील प्लॅट फॉर्मच्या कामासाठी चार दिवसाचा ब्लॉक  असल्याने होळीपुर्वी अनेक गाडया रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.गुजरात राज्यातील उधना रेल्वे स्थानकावर प्लॉट फॉर्मच्या कामासाठी दि.3 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपासून दि.6 सकाळी 9 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेतर्फे ब्लॉक असल्याने अनेक गाडया रद्द करण्यात आल्या आहेत. अचानकपणे झालेल्या या निर्णयामुळे दि.3 व 4 मार्च रोजी प्रवाशांचे मोठी गैरसोय झाली.

दरम्यान हा ब्लॉक उद्या दि. 5 व 6 मार्च रोजी देखील असणार आहे. त्यामुळे नंदुरबार येथील प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दरम्यान अनेक दिवसांपासून प्रवाशांनी टिकीटे बुक करून ठेवली आहे. ऐन होळीचा अगोदर रेल्वे ब्लॉक झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

रेल्वे
या रेल्वे गाड्यांमध्ये अंशतः बदल

अनेक गाडयांमध्ये अंशतः बदल करण्यात आला असून यात दि.5 मार्च रोजी 19106 पाळधी-उधना ही गाडी चलनाथपर्यंत असणार आहे. तर 19004 भुसावळ- बोरीवली ही गाडी भुसावळपासून नवापूरपर्यंत धावणार आहे.

तर 19006 भुसावळ-सुरत ही भुसावळहुन सोनगडपर्यंतच धावणार आहे. 09096 नंदुरबार-सुरत चलनाथपर्यंतच धावणार आहे. 09378 नंदुरबार-सुरत मेमो चलथानपर्यंतच जाणार आहे.

20930 वारासणी- उधना चलनाथपर्यंत तर 19008 भुसावळ-सुरत रेल्वेगाडी बारडोलीपर्यंत धावणार आहे. 09095 सुरत- नंदुरबार ही गाडी चलथानहुन सुटून नंदुरबारपर्यंत 09377 सुरत-नंदुरबार ही गाडी चलथानहुन नंदुरबारपर्यंत धावणार आहे.

तर 19105 उधना-भुसावळ ही गाडी उधना ते चलथान दरम्यान रद्द करण्यात आली असून चलथान ते नंदुरबार दरम्यान धावणार आहे. दि.6 मार्च रोजी 19008 भुसावळ-सुरत गाडी ही बारडोलीपर्यंत जाणार आहे तर 20930 वाराणसी-उधना ही रेल्वेगाडी चलथानपर्यंत धावणार आहे.

या रेल्वे गाड्या झाल्या रद्द

उद्या दि. 5 मार्च रोजी 19426 नंदुरबार बोरीवली- पॅसेंजर, 20925 अमरावती-सुरत, 19425 बोरीवली-नंदुरबार 19007 सुरत-भुसावळ या गाडया रद्द करण्यात आल्या आहेत.दि.6 मार्च रोजी 20926 अमरावती-सुरत, 09052 भुसावळ-बांद्रा, 19005 सुरत-भुसावळ, 22138 अहमदाबाद- नागपूर (प्रेरणा एक्सप्रेस) या गाडया रद्द करण्यात आल्या आहेत.तर दि.8 मार्च रोजी 19006 भुसावळ-सुरत (पॅसेंजर) रद्द करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments

|