Header Ads Widget


शहादा तालुक्यातील बहिरपूर व बिलाडी शेत शिवारात अवैध प्रकारे दारु विक्री करणा-या व्यक्तींवर गावकऱ्यांकडून कारवाईची मागणी...

शहादा/ प्रतिनीधी 

शहादा तालुक्यातील बहिरपूर व बिलाडी शेत शिवारात अवैध रित्या सुरू असलेल्या दारु विक्री करणा-या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी असी मागणी:- गणेश खर्डे मलगाव उपाध्यक्ष-पुणे जिल्हा तथा कार्याध्यक्ष-नंदुरबार जिल्हा बिरसा फायटर्स महा,राज्य व राज्य उपाध्यक्ष जय रावण प्रतिष्ठान महा,राज्य यांनी पोलिस अधीक्षक साहेब नंदुरबार व पोलिस निरीक्षक साहेब शहादा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की शहादा तालुक्यातील बहिरपुर व बिलाडी गाव शेत शिवारात अवैध रित्या सुरू असलेल्या दारु विक्री करणा-या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी म्हणून येथील समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच पोलिस पाटील व जेष्ठ नागरिक यांनी उपनिरीक्षक साहेब पोलिस स्टेशन म्हसावद येथे ११/०४/२०२२ रोजी तक्रार दाखल केली होती परंतु पोलिसांकडून कुठल्या ही प्रकारे दारु विक्री करणा-या व्यक्तींवर प्रतिबंध केले नही आहे ग्रामस्थांनी अनेक वेळा उपनिरीक्षक साहेब पोलिस स्टेशन म्हसावद येथे तक्रार सुद्धा नोंदविले आहे तरी सुद्धा अवैध प्रकारे दारु विक्री करणा-या व्यक्तींवर कारवाई केली नाही कारण की बहिरपुर गावात 40/45 वर्षे पासून दारुबंदी असुन सर्व नागरिक सुखी समाधानीने राहत असुन तसेच गाव तंटामुक्त आहे. कुठल्या ही केसेस पोलिस स्टेशन ला नोंद नसुन गावात सध्या स्थितीत शांतता असुन गावात कुठल्याही प्रकारची निवडणूक न लढविता सर्वानुमते बिनविरोध निवड होत असते परंतु आजच्या स्थितीत गाव शिवारात काही समाजकंटक व्यक्ती अवैध प्रकारे दारु विक्रीचा व्यवसाय सुरू केला असुन गावातील तरुण पिढी ला या वेशनाचे लत लागत आहे आणि दारु मुळे अनेक घरपरिवार चे नुकसान होत आहे आसपास अवैध प्रकारे दारु विक्री सुरू असुन गावात व शेतात साहित्य,मोटर,केबल,वायर,ठिबक,सिंचन, नळ्या,केळीच्या,पिकाचे गळाचे नुकसान व शेतात उभ्या पिकांमध्ये रस्ता काढुन दारु पिणारे लोक जातात त्यामुळे शेतमालाची नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे या मुळे गावातील शांतता भंग होत आहे गावातील त्या दारु विक्री करणा-या इसमाला वर गावकऱ्यांनी समजावून सांगितले की दारु विक्री बंद करून द्यावे म्हणून तरी सुद्धा गावकऱ्यांचे काही न ऐकता दारु विक्री सुरूच ठेवले आहे सदर दारु ही मध्यप्रदेशातून अवैध मार्गाने रात्री बेरात्री दारु आणुन दारु विक्री केली जाते तरी सर्व ग्रामस्थांनी दारु विक्री करणा-या व्यक्तींवर प्रतिबंध करण्यात यावे म्हणून असी लेखी तक्रार उपनिरीक्षक साहेब पोलिस स्टेशन म्हसावद येथे दिले होते तरी कुठल्या ही प्रकारे विक्री करणा-या व्यक्तींवर प्रतिबंध अजून पर्यंत करण्यात आले नहीतरी आपणास विनंती करण्यात येते की सदर दारु विक्रीस करणारे व्यक्तींवर प्रतिबंध करण्यात यावे अशी विनंती
अवैध प्रकारे दारु विक्री करणा-या व्यक्तींचे नावे खालीलप्रमाणे , 
१) राकेश पवार २) युवराज भामरे ३) बलराम भामरे ४) जगदीश खेडकर ५) वसंत खेडकर ६) विक्रम अहिले ७) पानलाल भील ८) संतोष भील

तरी आपणास विनंती करण्यात येते की वरील विषयावर दखल घेऊन अवैध प्रकारे दारु विक्री करणा-या व्यक्तींवर प्रतिबंध करण्यात यावे अशी मागणी बिरसा फायटर्स महा,राज्य व समस्त ग्रामस्थांना बहिरपुर यानी केले आहे.

Post a Comment

0 Comments

|