Header Ads Widget


नवापुर वनविभागाची धडक कारवाई भवरे ते बारी रस्त्याने पेट्रोलिंग करताना मोटार सायकलने सागची लाकडे वाहतूक करणारे मोटार सायकल व साग लाकडासह 40 ते 50 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त ..

नवापूर/बुलेटिन

दि. 3 मार्च 2023 रोजी रात्री नवापूर प्रादेशिक वनक्षेत्रपाल  व रेंज स्टाफ नवापूर प्रादेशिक यांच्यासह खाजगी वाहनाने भवरे ते बारी रस्त्याने पेट्रोलिंग करताना एक अज्ञात इसम मोटार सायकलने लाकडे वाहतूक करताना दिसला, सदर इसमाचा पाठलाग केला असता त्याने मोटार सायकल व साग चौपट नग टाकून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगांची मोटार सायकल क्रमांक MH 39 - O-1604 व साग चौपाट नग 7 जप्त करून खाजगी वाहनात भरून शासकीय विक्री आगार नवापूर येथे आणून जमा केला. 
जप्त  करण्यात आलेला साग माल 7 चौरस नग,  0.240 घन मीटर व हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगांची मोटार सायकल क्रमांक MH 39 - O- 1604 या सर्व मालाची बाजार भावानुसार अंदाजित किंमत 40 ते 50 हजार  रूपये एवढी असून सदरची कार्यवाही नवापूर प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल, वनपाल खेकडा भिवाजी दराडे, वनरक्षक कल्पेश अहिरे, संतोष गायकवाड यांनी वनसंरक्षक धुळे दि.वा.पगार, उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग नंदुरबार कृष्णा भवर, विभागिय वनाधिकारी दक्षता पथक धुळे संजय पाटील, सहाय्यक वन संरक्षण प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार धनंजय ग.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
वनक्षेत्रपाल नवापुर प्रा.नंदुरबार वनविभाग नंदुरबार यांजकडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments

|