Header Ads Widget


स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजने अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामे त्वरित पुर्ण करावीत.. :- डॉ.विजयकुमार गावित (आदिवासी विकास विभाग व पालकमंत्री नंदुरबार)

नंदुरबार/बुलेटिन
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) अंतर्गत ग्रामस्तरावर सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे करण्यासाठी प्रकल्प अहवाल , कामाचे अंदाजपत्रके तयार करून  त्यांची ई निविदा  प्रसिद्ध करण्याची कामे १५ दिवसात पूर्ण करावीत अशा सूचना आदिवासी विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी दिल्या .

जिल्हाधिकारी कार्यालय येथील विर बिरसा मुंडा सभागृहात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील २७ ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांचेसाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना वरिल सूचना पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या . बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ . सुप्रिया गावित , खासदार डॉ . हिना गावित , जिल्हाधिकारी मनिषा खत्री, प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, निवासी उप जिल्हाधिकारी सुधीर खांदे , जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार , प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील , उप मुख्य कार्यकारी अधिकारी आर . एम . पाटील , जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक जयवंत उगले , कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर आदीसह गाव कृती आराखडा तयार करणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते .
यावेळी पालकमंत्री डॉ . विजयकुमार गावित यांनी ग्रामपंचायत निहाय सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामांविषयी सविस्तर आढावा घेतला .यावेळी संस्थेमार्फत गावाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना भूमिगत गटार , लीच पीट आदी प्रकल्प अहवालात  घेण्यात येणाऱ्या कामाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले .तसेच प्रकल्प अहवाल व गावाचे अंदाजपत्रक तयार करताना गावाच्या गरजेनुसार आराखडा तयार करण्यात यावा . आगामी १५ दिवसाच्या आत सर्व ग्रामपंचायतीचे आराखडे व अंदाजपत्रकाना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तांत्रिक मान्यता देण्यात यावी व ई निविदा तात्काळ प्रसिध्द करण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्री डॉ गावित यांनी संबंधिताना दिल्या . तसेच जिल्ह्यातील   प्लास्टीक चे व्यवस्थापन करणेसाठी तालुकास्तरावर रनाळे ता नंदुरबार , प्रकाशा ता . शहादा , बोरद ता . तळोदा या ठिकाणी तालुकास्तरीय प्लास्टीक कचरा व्यवस्थापन प्रकल्प घेण्याच्या सूचना देऊन प्रकल्प अहवाल तयार करून त्यास तात्काळ तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात याव्यात अशा सूचना दिल्या .
बैठकीत खासदार डॉ . हिना गावित यांनी गावाचे प्रकल्प अहवाल तयार करताना सरपंच व ग्रामसेवक यांनी प्रकल्प अहवाल तयार करणाऱ्या संस्थेशी समन्वय ठेवावा . गावातील सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन  चांगल्या पद्धतीने होईल यासाठी  सर्व घटकांचा अंतर्भाव करून प्रकल्प अहवाल तयार करण्यात याव्यात अशा सूचना प्रकल्प अहवाल तयार करणाऱ्या संस्थाना दिल्या . तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन विषयक कामे प्रसावित करताना ग्रामपंचायती नी १५ वा वित्त आयोग , पेसा , स्वनिधी तसेच आदर्श गाव योजनेतून उपलब्ध होणाऱ्या निधीचा  विनियोग करावा व गावे आदर्श करावीत असे आवाहन यावेळी केले . प्रास्ताविक स्वच्छ भारत मिशन ग्रामीण चे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनिल पाटील यांनी केले . बैठकीत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण चे सर्व कर्मचारी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments

|