Header Ads Widget


महाविकास आघाडी तर्फे तहसील कार्यालय ,साक्री येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्ना संदर्भात आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले ...

      
प्रतिनीधी/अकील शहा
साक्री : शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला 1500 रुपये क्विंटल भाव व 2018 वर्षाचे तालुक्यात गारपीट नूतनीच्या पंचनामाची 97 कोटी रु. अनुदान मिळावे यासाठी काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष शिवसेनेचे( ठाकरे गट)   
                 
यांच्यातर्फे शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे याकरिता काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) यांनी राज्य शासन केंद्र शासनाने त्वरित निर्यात बंदी उठवावी कांद्याला किमान तीन हजार रुपये व राज्य शासनाने पंधराशे रुपये प्रति क्विंटल भाव द्यावे या मागणीचे नियोजन केंद्र सरकार व राज्य शासनाने करावे असे निवेदनाद्वारे विनंती करण्यात आले. तसेच 2018 या वर्षी साक्री तालुक्यात गारपीट होऊन रब्बी पिकांचे 97 कोटी रुपयांचे अनुदान पंचनामे झालेल्या पिकांना मिळाली होते. पाच वर्षापासून या अनुदानाचा शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले नाहीत. तरी त्वरित शेतकऱ्यांना अनुदानित करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची राज्य शासनाने त्वरित दखल घ्यावी यासाठी कांग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना(ठाकरे गट)यांच्या वतीने साक्री चे तहसीलदार. प्रवीण चव्हाणके यांना निवेदन देण्यात आले ,
निवेदन देतेवेळी माजी खासदार बापू चौरे ,माजी आमदार डी.एस.अहिरे, पंचायत समिती सभापती शांताराम कुवर, माजी पंचायत समिती उपसभापती नरेंद्र मराठे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र मराठे, शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख पंकज मराठे, किशोर वाघ, बाळा शिंदे, उत्तमराव देसले ,गणेश गावित ,करीम शहा, सचिन बेडसे ,नरेंद्र तोरवणे, डॉक्टर दिलीप चोरडिया आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|