Header Ads Widget


मुंबई आग्रा महामार्गावर चार चाकीचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा जागी मृत्यू.


नांदगाव :- मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी जवळ असलेल्या पंढरपूर वाडी समोर भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना झाली आहे. तर अपघातात एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई - आग्रा महामार्गावर वाहतूक काही काळ खोळंबली होती. सदर झालेल्या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक आठ मार्च 2023 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी जवळ असलेल्या पंढरपूरवाडी समोर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारी चारचाकी एसेंट कार क्रमांक एम एच 04 एफ.ए.8211  ही गाडी भरधाव वेगाने जात असताना गाडीची पुढील टायर अचानक फुटले यावेळी कारचालकाने कार वरील नियंत्रण सुटल्याने ही कार थेट डिव्हायडर क्रॉस करून विरुद्ध बाजूला गेली.


दरम्यान मुंबईहून नाशिककडे अपघातग्रस्त वॅगन काय घेऊन जाणाऱ्या टोइंग व्हॅनवर ही एसेंट कार जोरदार आदळली भीषण अपघात होऊन या अपघातात एकाच कुटुंबातील एक लहान मुलीसह एक महिला व दोन पुरुष जागेवरच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. रस्त्यात सर्वत्र गाडीच्या काचा पसरल्या होत्या. एक कुटुंब आपल्या कार मधून मुंबईकडे जात असताना रस्त्याने नशिबाने त्यांच्यासोबत घात केला. आणि काही क्षणातच कुटुंब संपलं आणि होताच नव्हतं झालं. मुंबई आग्रा महामार्गावरच सर्वत्र गाडीच्या काचा आणि रक्तबंबाळ अवस्थेत अपघातग्रस्तांना पाहून अपघात स्थळी असलेल्या नागरिकांच्या अंगाला काटा आला. जखमी असलेल्या अपघातग्रस्ताला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातातील मृतांची नावे अद्याप समजली नसून या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments

|