Header Ads Widget


पोलीस अधीक्षक श्री. पी.आर. पाटील यांची नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 06 अमंलदारांना पदोन्नतीची भेट...!!!


नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी अमंलदारांच्या कल्याणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांना सहा. पोलीस उप निरीक्षक पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्याची संकल्पना मांडली तात्काळ मंत्रालयीन कर्मचारी यांचेकडून किती पोलीस अंमलदारांना सहा. पोलीस उप निरीक्षक पोलीस हवालदार पदावर पदोन्नती दिली जाईल ? याची माहिती घेतली. तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांना तात्काळ पदोन्नतीबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. मंत्रालयीन कर्मचारी यांचेकडून पदोन्नतीची कार्यवाही करुन पदोन्नतीस पात्र असणाऱ्या 06 अमंलदारांना आज दिनांक 09/03/2023 रोजी स्वत: पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे दालनात उपस्थित राहणेबाबत कळविले.

पदोन्नतीस पात्र असणाऱ्या पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे दालनात बोलविले. पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे दालनात का बोलाविले असेल ? असा प्रश्न त्या पोलीस अंमलदारांना पडला, परंतु नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी त्या 03 पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार यांना सहा. पोलीस उप निरीक्षक या पदावर 03 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती झाल्याचे सांगताच त्या सर्व पोलीस अमंलदारांचा आनंद द्विगूणीत होवून त्यांचे चेहऱ्यावर हसू फुलले.

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 03 पोलीस हवालदार यांना सहा. पोलीस उप निरीक्षक 03 पोलीस नाईक पोलीस हवालदार या पदावर सेवा जेष्ठतेनूसार पदोन्नती दिलेली आहे.

पदोन्नती झालेल्या जिल्ह्यातील पोलीस अमंलदारांना पोलीस अधीक्षक यांचे दालनात एक छोटेखानी पण दिमाखदार कार्यक्रम आयोजित करुन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी पोलीस अमंलदारांना सहा. पोलीस उप निरीक्षक पदाचे स्टार पोलीस हवालदार पदाचे फित लावून पोलीस अमंलदारांचे अभिनंदन केले पोलीस दलातील पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

पदोन्नती झालेल्या पोलीस अंमलदारांना पदोन्नती मिळाल्यानंतर मिळणारे वेतन भत्ते याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल. नंदुरबार जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेबरोबरच पोलीस अधिकारी अमंलदारांच्या अडी-अडचणी समस्या देखील वेळेवेर सोडविल्या जातील. तसेच गैर कायदेशीर कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी.आर.पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) श्री. विश्वास वळवी, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. भरत जाधव, वाचक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अर्जुन पटले पदोन्नती मिळालेले अंमलदार इत्यादी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

|