नंदुरबार/प्रतिनीधी
आज दि.10/3/23.रोजी महिला दिनानिमित्त DSC.संस्था नंदुरबार तसेच महिला ग्रांमसंघ यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार केले.गावतील मोठ्या संख्येने महीला उपस्थित होत्या.DSC(development saprt senter) च्या मयुरी पाटील यांनी आरोग्य व कुपोषण विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
दक्षा वसावे, यांनी महिला दिना विषयावर माहिती दिली तसेच प्रविणा ठाकरे यांनी महिलांची विविध क्षेत्रातील प्रगती तसेच संस्थेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार बाबतीत माहिती दिली तसेच सोनवणे सरांनी संस्थेच्या उपक्रम बद्दल मार्गदर्शन केले.वसावे सिस्टर यांनी देखील महिलांचे आरोग्यावर माहिती दिली.
तसेच संस्थेने प्रत्येक महिलेला नेलकटर व चिक्की भेट दिली.तसेच आर्थिक परिस्थितीत मुलींना शिक्षण देणाऱ्या मातांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित महिला आयोगा माजी.सदस्या लताबाई भिमसिंग वळवी उपस्थितीत होत्या. इसाईनगर महिला बचत गट व अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले.
0 Comments