Header Ads Widget


संविधान आर्मीचे निवेदन ; शहादा शहरातील सुरु असलेले अवैध दारू, गांजा व जुगार कायमस्वरूपी बंद करावे न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा...

शहादा/ प्रतिनीधी 

काल दि.10/03/2023 शुक्रवार रोजी शहादा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक (PI) राजन मोरे साहेब यांना संविधान आर्मी नंदुरबार मार्फत निवेदन देण्यात आले.
गैरकायदेशीर धंदे दारू,गांजा,जुगार यांचा प्रमाण शहादा शहरात वाढला आहे तो त्वरीत बंद झाला पाहिजे यासाठी निवेदन दिला.

शहादा शहरातील अवैध दारू गांजा व जुगार कायमस्वरूपी गैरकायदेशीर धंदे बंद न झाल्यास संविधान आर्मी ही राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.जगनभाऊ सोनवणे साहेब यांच्या नेतृत्वात शहादा शहरात तीव्र आंदोलन करणार.
                    
शहादा पोलिस निरीक्षक मोरे साहेबांनी आश्वान दिले आहे,की जे पण हा धंदा करताहेत त्वरीत त्यांच्या वर सक्त कारवाई होणार.
निवेदन देतेवेळी ,
नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अल्तमश मन्सूरी साहेब, शहादा शहर अध्यक्ष अवेस पटवे साहेब, शहर महासचिव नवीद भाई अन्सारी, शहर युवा कार्यउपाध्यक्ष शब्बर भाई शेख, शहर युवा महासचिव हाशीम भाई कुरेशी, शहर युवा सचिव मोईन भाई कुरेशी, जुबेर भाई शाहव आदि कार्यकर्ता, पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|