प्रतिनीधी/अकिल शहा
साक्री :धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी साक्री तालुक्यातील टिटाणे, खोरी, पेटले, दुसाणे या भागात जाऊन पाहणी केली.
साक्री तालुक्यातील काही भागात सोमवारी अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. महाजन यांनी आज या भागाचा दौरा केला.
यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हीनाताई गावित, आमदार जयकुमार रावल, आमदार मंजुळाताई गावित, भाजपा जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन दहिते,जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. डी. मालपुरे, तहसीलदार श्री.प्रवीण चव्हाणके
पालकमंत्री श्री. महाजन यांनी अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना देण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
0 Comments