Header Ads Widget


शेतक-यांच्या मोर्चाला 'बिरसा फायटर्सचा' पाठिंबा;शेतक-यांच्या मागण्या पूर्ण करा: बिरसा फायटर्सची मागणी...

दापोली/प्रतिनीधी

शेतक-यांच्या मागण्या पूर्ण करा,शेतक-यांच्या लाँग मार्चला बिरसा फायटर्सचा पाठिंबा देत आहोत,या मागणीचे निवेदन गणेश खर्डे उपाध्यक्ष-पुणे जिल्हा तथा कार्याध्यक्ष-नंदुरबार जिल्हा बिरसा फायटर्स महा राज्य तथा राज्य उपाध्यक्ष जय रावण प्रतिष्ठान महा राज्य यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,नाशिकहून 6 मार्च रोजी निघालेला शेतक-यांचा मोर्चा आझाद मैदान मुंबईला पोहचला आहे.30 हजारांहून अधिक शेतक-यांनी नाशिक ते मुंबई अशी पायपीट केलेली आहे. हजारों शेतक-यांचा लाँग मार्च विधानसभनावर धडकणार आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी,वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करावी,वीज बील माफ करा अशा विविध मागण्यांसाठी बिरसा फायटर्स संघटनेने शासनास वारंवार निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे.मोर्चा,आंदोलन, उपोषण करून शेतक-यांच्या मागण्यांसाठी लढा दिला आहे.बिरसा फायटर्स संघटना नेहमीच शेतक-यांसोबत राहिली आहे.
शेतक-यांच्या प्रमुख मागण्यांची पूर्तता करण्यात यावी.संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी,शेेतमालाला हमीभाव देण्यात यावा,स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी.वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी.बोंड अळी व गारपीटने नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रत्येकी एकरला 40 हजार रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी.वीज बीलमाफी करावी.ऊसाला हमीभाव बंधनकारक करावा.पश्चिमेत नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतक-यांना देण्यात यावे.नद्या जोड प्रकल्पांचा प्रश्न सोडवावा.संजय गांधी निराधार योजना ,इंदिरा गांधी वृद्धापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजनांसंबंधीत मागण्यांची पूर्तता करावी.अशा विविध मागण्यांसाठी शेतक-यांच्या निघालेल्या लाँग मार्चला बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेकडून आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत.

Post a Comment

0 Comments

|