Header Ads Widget


शेवाळीला अवकाळी पावसाने झोडपले; शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान....

प्रतिनीधी/अकिल शहा 

हवामान विभागाने जसा अंदाज सांगितला तसा राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे.
 
साक्री तालुक्यातील शेवाळी(दा)गाव व परिसरात आज सकाळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली, परिसरात जोरदार पाऊस पडल्यामुळे  शेतकऱ्यांचे शेतामधील कांदा ,गहू अशा विविध पिकांवर त्याचा परिणाम होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे व तसेच वातावरणात बदल होऊन वातावरण थंड झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन (सर्दी,खोकला,ताप अंगदुखी ) आजारी पडण्याचे प्रमाण वाढणार शक्यता आहे, आधीच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसून(कांदा, कपाशी) अशावेळी अवकाळी पावसामुळे हाताशी आलेले पिकांचे नुकसान होऊन शेतकरी वर्गाचे शेतामधील पिकांचे नुकसान होऊन  शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे,
कांद्याला आधीच भाव नव्हता, त्यामुळे साठवून ठेवण्यासाठी चांगला असलेला उन्हाळी कांदा बाजारात येऊ लागला होता. त्यामुळे कुठेतरी उन्हाळ कांद्याचा काढणीला सुरुवात झाली होती. त्यातच पाऊस आल्याने कांदा खराब होणार आहे. तो सडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

यामध्ये काढणीला आलेले गहू देखील भुईसपाट झाले आहे. हाती आलेले जवळपास सर्वच पिके दुसऱ्यांदा आलेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला,शेतकऱ्याच्या शेतात जितकं पाणी आहे तितकेच पाणी शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यातून वाहत आहे. शेतातील ही परिस्थिती पाहून शेतकरी सुन्न झाला आहे.
 अशावेळी शासनाने त्यांच्या पिकाचे फक्त पंचनामा न करता तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी.

Post a Comment

0 Comments

|