Header Ads Widget


प्रेमात धोका ! काँग्रेसच्या शहराध्यक्षाने संपवलं जीवन! इन्स्टावर स्टेटस ठेवलं, अपनी राणी किसीकी दिवानी हो गई,


बुलढाणाः बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यात देऊळगाव मही येथील काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या शहराध्यक्षाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रेयसीने धोका दिला म्हणून आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय.

गजानन गुरव असं या २६ वर्षीय युवकाचे नाव आहे. गावातीलच एका युवतीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते, मात्र या युवतीने दुसऱ्याशी आपलं नातं जुळवल्यामुळे नैराश्यातून गजानन गुरव याने खंडोबा मंदिर परिसरात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आपल्या प्रेयसीने प्रेमात धोका दिला असल्याचं गजानने व्हॉट्सअप स्टेटस आणि इंस्टाग्रामच्या स्टेटसवर व्हिडिओ ठेवत आत्महत्या केली आहे.


आपल्या मित्र परिवाराला भावनिक मेसेजसुद्धा गजाननाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले होते. त्यामुळे गर्लफ्रेंडने प्रेमात धोका दिल्याने "अपनी राणी किसी की दीवानी हो गई" मी मेल्यावर माझी आठवण काढशील ना, असं म्हणत गजानन गुरव नामक या युवकाने आपली जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.


मृतक युवक हा काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचा शहर अध्यक्ष होता. तो नेहमीच राजकीय आणि सामाजित कार्यात अग्रेसर होता. मात्र, त्याने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयाने तालुक्यात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचे मित्र परिवारही त्याचा स्टेटस पाहून हळहळला आहे.

Post a Comment

0 Comments

|