जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी सरकारी कर्मचारी चार दिवसापासून संपावर आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन 4 दिवसांपासून सुरू असून सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबार जिल्हा सरकारी कर्मचारी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात 8000 पेक्षा अधिक सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते. सकाळी साडेनऊ वाजेपासून मोर्चेला प्रारंभ झाला नंदुरबार शहरातील नेहरू चौकातून मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला .मोर्चामध्ये सर्व शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. नंदुरबार शहरातील रस्त्यांवर तीन ते चार किलोमीटर पर्यंत मोर्चेचा लांब रांगा दिसून आल्या.
मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती मोठी दिसून आली.जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोर्चा सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यास सुरुवात झाली असून प्रशासनाच्या विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
जुनी पेन्शनच्या मागणीसाठी एका चिमुकल्याने आपल्या आई-वडिलांना म्हातारपणी पेन्शन मिळावी या मागणीसाठी मोर्चात सहभाग घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविल्याचेही दिसून आले.
तसेच हातात संविधान घेऊन महात्मा गांधीच्या रूपात एका सरकारी कर्मचाऱ्याने पेन्शन मिळावी यासाठी गांधी मार्ग अवलंबल्याचे चित्र दिसून आले.
मोर्चात नंदुरबार जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी यांचा संपात विशेष सहभाग असल्याने जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला.मोर्चा सकाळी साडेनऊ ते साडेबारा वाजेपर्यंत तब्बल तीन तासापर्यंत चालला त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मोर्चेची सांगता करण्यात आली.
0 Comments