ठाणे/प्रतिनिधी
पत्रकारांनवर होणारे हल्ले व त्या नंतर त्यांचा कुटुंबावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी व पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेने महाराष्ट्र राज्य व ठाणे जिल्हा तसेच उल्हासनगर शहरातील पत्रकारांना संघटने मध्ये सामावून घेत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीपजी रोकडे यांनी काल अंबरनाथ नगरपालिकेच्या पत्रकार कक्षेत ठाणे जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार नानासाहेब शेळके यांची नेमणूक केली.
तसेच उल्हासनगर तालुका अध्यक्षपदी पत्रकार संदिप साळवे यांची नियुक्ती केंद्र बिंदू ठरली. संदीप साळवे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे त्यांनी अनेक भ्रष्टाचार उघड केले आहे त्यांचा पत्रकारिताचा अनुभव व केलेल्या कामाचा आढावा घेऊन सन्माननीय अध्यक्ष प्रदीप रोकडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. असुन पत्रकारांवर येणाऱ्या अडचणी व संकटावर लोकपालक पत्रकार संघटना कायम खंबीर पणे उभा राहिल असे आव्हान नवनिर्वाचित अध्यक्ष नानासाहेब शेळके व संदिप साळवे यांनी केले.
या वेळी संघटनेचे सचिव भरत कारंडे, संघटक सचिव जगन्नाथ जावळे, सहसचिव संतोष क्षेत्रे, किरण पडवळ, तसेच अनेक दिग्गज व ज्येष्ठ पत्रकारांनी उपस्थिती लावली होती व नवनिर्वाचित सभासदांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.एस एस न्युज चे संपादक संदीप साळवे यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
0 Comments