Header Ads Widget


बालिकावर ऍसिड फेकतो अशी धमकी दिले या प्रकरणी आरोपीस शिक्षा.


कोल्हापूर, दि. २५/०३/२०२३

वरील तारखेस व ठिकाणी यातील आरोपी यांने फिर्यादी यांची मुलगी पीडिता नं १ व पुतणी पीडिता नं २ यांचा पदमाराजे शाळा ते गांधी मैदान या रोडवरती वाईट हेतूने पाठलाग करुन पीडिता नं २ हिचा एकदा खाऊ गल्ली कोल्हापूर येथे हात पकडून, तिचेशी बोलण्याचा प्रयत्न करून, तिने आरोपीस विरोध केल्यानंतरही, तिच्याशी बोलून पुन्हा दिनांक ०१/०८/२०१७ रोजी मुलगी पीडिता नं १ हिचे पाठीमागे मोटरसायकल वरून तिचा पाठलाग करून तिचेकडे तिचा व पुतणी पीडिता नं २ हिचा मोबाईल नंबर वारंवार मागणी केली असता त्या आरोपीच्या बोलण्याचे दुर्लक्ष केले असता आरोपीने ” संध्याकाळ पर्यंत मोबाईल नंबर दिला नाहीस तर तुझ्या तसेच पीडिता नं २ व फिर्यादीच्या नणंदेची मुलगी पीडिता नं ३ यांचे अंगावर अॅसिड फेकतो” अशी धमकी दिली असल्यामळे पीडितेच्या आईने आरोपी विरूध्द जुना राजवाडा पोलीस ठाणे मध्ये गुर नं १८९/२०१७ ने तक्रार दिली. सदर तक्रारीचे अनुषंगाने आरोपी विरूध्द तपासी अधिकारी यांनी भादवि स कलम ३५४ [ड], ५०६ सह लहान मुलांचे लैंगकि अपराधा पासुन बालकांचे सरंक्षण कायदा कलम १२ प्रमाणे जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे गुर नं १८९/२०१७ अन्वये गुन्हा नोंद झाला होता.सदर गुन्हयाचे कामी आरोपीस दोन अल्पवयीन बालीकांनवर ऍसिड फेकतो अशी धमकी दिल्यामुळे दोषी ठरवून मा न्यायालयाने भा द वि स कलम ५०६ प्रमाणे ६ महिने सक्तमजुरी व रक्कम रु ५०००/- दंड, तसेच दंड न भरलेस आरोपीस तीन महिने सक्त मजुरी अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

सदरच्या आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्या नावावर अन्य पोलसि ठाणेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक गुन्हे नोंद आहेत.

या कामी विशेष सरकारी वकील सौ अमिता ए कुलकर्णी यांनी एकुण ०६ साक्षीदार तपासले फिर्यादी, पीडित मुली व इतर साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या साक्षीदारांचे जबाब तसेच विशेष सरकारी वकील सौ अमिता ए कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद व दाखल केलेले मा उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांचे निवाडे ग्राहय मानुन मा न्यायाल्याने आरोपींस ६ महिने सक्तमजुरी व रक्कम रु ५०००/- दंड, तसेच दंड न भरलेस आरोपीस तीन महिने सक्त मजुरी अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

या कामी विशेष सरकारी वकिल सौ अअमिता ए कुलकर्णी यांना जुना राजवाडा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री सतिश कुमार गुरवसो, तपासी अधिकारी टी आर पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक, तसेच कोर्ट पैरवी अधिकारी सहा फौजदार जनार्दन खाडे, पोलीस हवलदार श्री हशिष सुर्यवंशी पाटील व महिला पोलीस हवालदार माधवी संजय घोडके यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments

|