प्रतिनिधी /अकील शहा
जिल्हा परिषद शाळा वासखेडी येथे माता पालक मेळावा प्रसंगी डॉ.राकेश साळुंखे यांच्या गुंज फाऊंडेशन तर्फे सर्व विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे, टिकला पाहिजेहा हार्दिक उद्देश डोळ्यासमोर ठेऊन वासखेडीचा भूमिपुत्र व रायगड जिल्ह्यातील नेरळ स्थित डॉ. राकेश गोरख साळुंके यांनी प्राथमिक शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व वही, पेन, कंपास, प्लास्टिक मुक्त पिशवी, पेन्सिल व आदी विविध शैक्षणिक साहित्य साहित्य देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक गोरख नथ्थू पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी विद्यालयच्या मुख्याध्यापिका के.एस.गायकवाड,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक कुंवर, स्वामी विवेकानंद पुरस्कार प्राप्त जितेंद्र दहिते आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका संगीता पाटील यांनी केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात गोरख साळुंखे यांनी ग्रामीण परिसरात राहून आपल्या मुलामध्ये योग्य संस्कार देऊन माणसाची आपल्या मातीशी, जन्मभूमीशी नातं, समाज आणि परिसर यांच्या जोपासना याविषयी सागितले. माझ्या मुलांना ही अनेक कर्तव्याचे धडे दिले त्यामुळे डॉ.राकेश पाटील हा पर्यावरणस्नेही असून प्लास्टिक समस्या माणसं, पशुपक्षी आणि परिसरासाठी घातक असून हा संदेश बालका पर्यंत पोहचला पाहिजे यासाठी पर्यावरण पूरक सुती कपडाची दप्तर पिशवी चे वाटप केले. प्लास्टिक बंदी कायदा पालन संदेश समाजाला दिला.प्लास्टिक मुक्त विषयी सखोल अशी माहिती सांगितली.
कै.सुमनबाई बाबुराव कुवर यांच्या स्मरणार्थ मीनाक्षी बाबुराव पाटील यांनी इयत्ता चौथीची हुशार विद्यार्थीनीं चेतना नरेश जगतापला बक्षीस दिले.मुख्याध्यापक संगीता पाटील मॅडम यांनी गुजरातहून परत आलेल्या पालकांचे प्रबोधन त्या मुलांचे नुकसान, त्यांचे रजिस्ट्रेशन इ.संबंधी माहिती दिली. व डॉ. राकेश साळुंखे यांच्यासारखी रत्ने प्रत्येक गावात जन्माला यावीत.आपल्या गावाशी मातीशी असलेली नाळ याचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केवबा बच्छाव व श्रीमती संगीता साळुंके यांनी केले . सुभाष पगारे यांनी आभार मानले.
0 Comments