Header Ads Widget


व्हि.जे.एन.टी. ( V.J.N.T. ) टिचर फेडरेशनच्या विभागीय उपाध्यक्ष श्री. योगेश्वर बुवा यांच्या मागणीला अखेर यश...

अक्कलकुवा/ ब्रेकिंग बुलेटिन 
अखेर प्रलंबित प्रोत्साहन भत्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा.
व्हि.जे.एन.टी.टिचर फेडरेशन च्या विभागीय उपाध्यक्ष योगेश्वर बुवा यांच्या मागणीला यश.

अक्कलकुवा तालुक्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तीस महिन्याचा प्रोत्साहन भत्ता व सातव्या वेतन आयोगाच्या दुसऱ्या हप्त्यापासून‌ वंचित होते.या संदर्भात वेतन पथक कार्यालयाला वारंवार पाठपुरावा करून आज अखेर संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात फरकाची रक्कम जमा झाल्याने कर्मचा-यांनी समाधान व्यक्त केले.याबाबत खात्यावर रक्कम जमा करण्याची मागणी व्ही.जे.एन.टी.टिचर फेडरेशन चे नाशिक विभागीय उपाध्यक्ष योगेश्वर बुवा यांनी केली होती.

सविस्तर वृत्त असे की, शासनाने तीस महिन्याचा प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर करून अनेक महिने उलटले असून प्रत्येक माध्यमिक शाळेतून सदर प्रोत्साहन भत्त्याची फरक बीले आठ ते दहा महिन्यांपूर्वी संबंधित वेतन पथक कार्यालयात जमा करण्यात आली होती.पण सदरील  सातव्या वेतन आयोगाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम देखिल अद्याप पर्यंत देण्यात आला नसल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात रोष व्यक्त करण्यात येत होता..नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून देखील अनेक महिने उलटून देखील काही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.याबाबत  वेतन पथक कार्यालयात व पूणे येथील मुख्य कार्यालयात ही  सतत पाठपुरावा केला होता.त्याची दखल घेऊन तीस महिन्याच्या प्रोत्साहन भत्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाली व काही दिवसांतच सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता देखील दिला जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
     
शासनाने तीस महिन्याचा प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर करून अनेक महिने उलटून देखील अक्कलकुवा तालुक्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित होते. तसेच सातव्या वेतन आयोगाचा दुसऱ्या हप्त्याचा फरक ही अद्याप देण्यात आला नाही.तरी दोन्ही फरकाच्या रकमा लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी व पाठपुरावा केला असताना सदर प्रोत्साहन भत्त्याची  रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याने कर्मचा-यांनी समाधान व्यक्त केले.
      

Post a Comment

0 Comments

|