Header Ads Widget


कृपया हा RTO भ्रष्टाचाराचा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा... Live Nation News Bulletin

कृपया हा  RTO भ्रष्टाचाराचा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा... Live Nation News Bulletin


५ वर्ष जुन्या खाजगी गाडया पुन्हा पासींग करण्यासाठी फुले नगर आरटीओ ला अनाव्या लागतात. 99% कामं ड्रायव्हिंग स्कूल, डीलर किंवा एजंट तरफे केली जातात .  सरकारी फी आणि सरकारी कागदपत्रांची पूर्तता केल्यावर अधिकारी गाडीच इन्स्पेक्शन करतो. गाडीची फक्त बेसिक गोष्टी तपासल्या जातात. जसं की गाडीचा रंग, दोन्हीं आरसे, इंडिकेटर, लाईट. आणि इन्स्पेक्शन झाल्यावर प्रत्येक पेपरची एका रजिस्टर मध्ये नोंद केली जाते आणि क्रमांकानुसार त्या पेपर वर एक सांकेतिक क्रमांक दिला जातो. त्यानंतर अधिकाऱ्याच्या आजूबाजूला एक ड्रायव्हिंग स्कूल चा माणूस बसलेला असतो त्यांच्याकडे  अधिकाऱ्याच्या च्या नावाचा शिक्का असतो, दुचाकी साठी २५० रुपये आणि चारचाकी साठी ३०० रुपये, गाडी दुसऱ्या राज्यातून ट्रान्स्फर झाली असेल तर ७०० रुपये, मोठ्या अवजड वाहनासाठी १५०० ते ४००० रुपये किंवा कुठल्याप्रकारची अडचण आसेल तर पैसे जास्त द्यावें लागतात. उदाहणाद म्हणजे चारचाकी गाडीची काच फुटली असेल तर जास्तीचे 2000 रुपये, गाडीचा रंग बदलला असेल तर 1000-2000 रुपये जास्त द्यावें लागतात. वसुली करणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूल मालकाला ठरलेले पैसे दिल्यानंतर अपल्या पेपर वर ते एक शिक्का देतात. आणि त्यांच्याकडे असलेल्या कागदावर त्या क्रमांकानुसार पैसे आल्याची नोंद केली जाते.  हया स्कूल मालकासोबत ह्याचे आणखिन ३ नातेवाईक फुले नगर आरटीओ मध्ये वेग वेगळ्या कामाची अश्याच प्रकारची वसुली कमिशन बेसिस वर बऱ्याच दशकापासून करत आहेत.  शिक्का मिळाल्यानंतर तो पेपर बाहेर बसलेल्या अधिकाऱ्याकडे फायनल आप्रोवल साठी दिला जातो. जर कोणत्याही पेपर वर रिष्वतचा शिक्का नसेल तर तो पेपर फेकून दिला जातो, किंवा पेंडींग ठेवला जातो.वसुली वाल्या स्कूल मालकाकडे जेवढी रक्कम जमा होते त्या रकमेतून तो स्वतःच कमिशन घेऊन बाकीची रक्कम निरीक्षकाच्या पर्सनल ड्रायव्हर कडे देतो. दर महिन्याला अधिकाऱ्यांची वेग वेगळ्या कामासाठी बदली केली जाते. पण वसुली वाले तिथेच बसुन त्याच प्रकारची वसुली संपूर्ण आरटीओ मध्ये बऱ्याच वर्षापासून करत आहेत. Live Nation News 


ड्रायविंग टेस्ट फुले नगर आरटीओ मध्ये दुचाकी ड्रायव्हिंग टेस्ट आणि मुदत संपलेल्या सगळ्या लायसेन्स चि टेस्ट घेतली जाते. दुचाकी साठी हिते सुद्धा १०० रुपये चारचाकी साठी ३०० रुपये  रिक्षा ३००, त्याचप्रमाणे ट्रॅक्टर, जेसीबी अश्या वेग वेगळ्या वाहणांच्या लायसेन्स साठी ५०० ते ४००० रुपयांपर्यंत अधिकाऱ्याला द्यावें लागतात. सर्व प्रथम हिकडे दोन गट असतात जी अर्जदार ड्रायव्हिंग स्कूल तर्फे येतात ते आणि दुसरे म्हणजे जि अर्जदार एजंट तर्फे येतात. एजंट साठी च्या लाईन मध्ये अधिकाऱ्याच्या हातात पेपर देण्या आधी रिश्र्वतची रक्कम तिथे असलेल्या ड्रायव्हिंग स्कूल मालकाकडे द्यावी लागते. त्याला रक्कम दिल्यानंतर आपल्या अर्जावर स्टँप किंवा पेना नी मार्किंग केली जाते. अधिकाऱ्यांनी ती मार्किंग पाहिल्यावर रिश्र्वतचे पैसे जमा झाल्याची खात्री होते. अर्जदार जर ड्रायव्हिंग स्कूल किंवा एजंट च्या मदतीशिवाय आला आसेल तर त्याला गाडीचे सगळे पेपर मागण्यात येतात म्हणजे की गाडीची आरसी, इन्शुरन्स, पिऊसी, ह्यापैकी काहीही नसेल तर त्याला पळवन्यात येते आणि शेवटी उपस्थित एजंट ला जेव्हां ५००-६०० रुपये दिले जातात तेंव्हा मात्र त्या उमेदवाराचा त्याच कागदपत्रा अभावी अर्ज स्वीकारला जातो. प्रत्येक अर्ज किंवा लायसेन्स नुसार पैसे आल्याची मार्किंग घेऊन सुद्धा बरेच लालची अधिकारी पैश्याच्या हव्यासापोटी जाणून बुजून दुचाकी ड्रायव्हिंग टेस्ट मध्ये अर्जदारास शुल्लक कारणास्तव नापास करतात, मुख्यत्वे ह्यांच टार्गेट महिला अर्जदार किंवा वयस्कर लोकं असतात. त्यानंतर नेहमीप्रमाणे ५०० ते १००० रुपयांपर्यंत लाच अधिकाऱ्याला मिळाल्यावरच अर्जदाराला पास करण्यात येते. आणि अर्जदाराला पुन्हा हेलपाटा वाचावा म्हणून नाईलाजास्तव त्यांची ही सुद्धा मागणी पूर्ण करावी लागते. Live Nation News


ड्रायव्हिंग स्कूल चे पेपर भरपूर असल्यामुळे तिथे पद्धत थोडी वेगळी आहे . सर्वप्रथम ड्रायव्हिंग स्कूल च्या परीक्षा घेतल्या जातात, आणि प्रत्येक अर्जावर त्या त्या ड्रायव्हिंग स्कूल चा शिक्का असतो. ड्रायव्हिंग स्कूल मालकाला जेव्ढे स्वतःचे अर्जदार आहेत त्यांची लिस्ट बनवावी लागते, ती लिस्ट आणि पैसे नेहमीच्या ठरलेल्या माणसाकडे जमा करावी लागते. त्यानूसार सगळे पैसे आल्यावरच शेवटी एक एक अर्ज approve केले जातात. Live Nation News


आरटीओ मधील प्रत्येक कामात एक मोठी उणीव असते. अर्ज स्वीकारल्यावर कधीचं ते अर्ज लगेच approval केले जात नाहीं. बहुतांश अर्जासाठी 3-4 ठिकाणी approval आणि ह्यासाठी 5-6 दिवस जतात. साध्या पसिंग च्या कामासाठी सुद्धा गाडीच inspection झाल्यावर त्वरित फिटनेस दिलं जातं नाहीं त्यासाठि पुन्हा 4-5 दिवसांनी हेलपाटे मारावे लागतात. Live Nation News 


संबंधित व्हिडिओ हया आधी सुद्धा केंद्रीय मंत्री आणि परिवहन आयुक्तांना पाठवला आहे, पण कोणावरही कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. पडद्यामागची कार्यवाही किंवा कागदोपत्री कार्यवाही झाली आसेल तर त्यांनाच माहित. आज ही अश्याच प्रकारची वसुली   सर्रास चालू आहे, फरक फक्त एवढाच की पैसे घेणारे हात आणि जागा बदलली आहे. Live Nation News


लाचलुचत विभागाला तक्रार करावी तर कोणतेच अधिकारी त्यांच्या हातात पैसे घेत नाहित असे शिल्लक कारण देऊन हया सगळ्यांवर जाणुन बुजुन डोळे झाक करत आहेत किंवा आपल्या दुरबलतेच उदाहरण देत आहेत, त्याउलट केंद्रीय मंत्री लाचुचपत विभागाला तक्रार करा अशी कारण देऊन आपल्या जबाबदारीतून पळ काढत आहे. Live Nation News


© - Hrishikesh Marne 

ऋषिकेश मारणे

चीप पब्लिसिटी हेड पुणे

आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन

==================================

Post a Comment

0 Comments

|