Header Ads Widget


ढेकवद ते नंदूरबार रेल्वे क्रॉसिंग गेट 88 मार्गावरील वाहतूक बंद


नंदुरबार ! Nandurbar/LivenationNews

नंदुरबार,रेल्वे लाईन दुरुस्तीच्या कामासाठी ढेकवद ते नंदूरबार  मार्गावरील रेल्वे गेट नंबर 88 कि.मी.154/02-04 या मार्गावरील वाहतुक 2 फेब्रुवारी,2023 सकाळी 8 पासून ते 5 फेब्रुवारी, 2023 रोजी सांयकाळी 19-00 वाजेपर्यंत बंद करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले आहे.
यामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने सदर कालावधीत काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही, यासाठी पोलीस विभागाने रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधुन यामार्गावरील वाहतूक वळविण्याबाबत कार्यवाही करावी. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

|