Header Ads Widget


घरफोडी चोरी करणारे रेकॉर्डवरील एका गुन्हेगारास अटक, एकूण २,५२,८७५ /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

 

LiveNationNews Bulletin

कोल्हापूर, दि. ०६/०२/२०२३.
दि.२३।१२।२०२२ रोजी दुपारी १.४५ वा.पासून ते २.४० वा.चे दरम्यान मुदतीत फिर्यादी या व त्यांचे पती आपले राहते घर बंद करुन कामावर गेले असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे समंतीशिवाय बंद घराचे दरवाजाचा कडीकोयंडा व कुलूप तोडून फिर्यादी यांचे घरातील लोखंडी तिजोरीतील सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरुन नेला आहे. सदर बाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे भा.द.वि.स.क.४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

पोलीस अधीक्षक, श्री शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर गुन्ह्याचा समांतर तपास करणे बाबत आदेशित केले होते। तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथक नेमूण गुन्हयाचे ठिकाणी भेट देवून तसेच गोपनीय व तांत्रिकरित्या माहिती काढून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकरीता योग्य ते मार्गदर्शन करून सुचना दिल्या।

पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी दिले सुचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक शेषराज मोरे तसेच पोलीस अंमलदार महेश खोत, संजय इंगवले, अमर शिरढोणे व सुरज चव्हाण यांचे पथक नेमले. पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणणेचे दृष्टीने गुन्हा घडले ठिकाण, वेळ व पध्दत याचा अभयास करुन तपास करीत असताना वरील तपास पथकातील पोलीस अमंलदार महेश खोत व संजय इंगवले यांना दि.०२।०२।२०२३ रोजी त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्हा हा घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील सांगली जिल्ह्यातील आरोपी याने केला असून तो नमुद गुन्ह्यातील चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने विक्री करणे करीता स्प्लेंडर मोटर सायकल वरून कोल्हापूर ते जयसिंगपूर जाणारे रोडवरील भाग्यश्री रोपवाटिका, चिपरी, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर येथे येणार आहे.

सदर मिळाले माहितीचे अनुषंगाने नमुद तपास पथकाने दि.०२।०२।२०२३ रोजी कोल्हापूर ते जयसिंगपूर जाणारे रोडवरील चिपरी गांवचे हद्दीतील रोपवाटिका समोर जावून सापळा लावून आरोपी यास पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे शिवाजीनगर पोलीस ठाणेस दाखल असले गुन्ह्यातील चोरुन नेलेले ४५ ग्रॅमचे सोन्याचे, १० ग्रॅम चांदीचे दागीने व इतर साहित्य असा एकूण २,५२,८७५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. त्याबाबत त्याचेकडे तपास केला असता त्याने शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील दाखल असले घरफोडी चोरीचा गुन्हा केलेची कबुली दिलेने त्याचे कब्जात मिळुन आलेला मुद्देमाल जप्त करुन त्यास ताब्यात घेतला आहे. आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे जमा केले आहे.सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन यापुर्वी त्याचेवर घरफोडी चोरीचे २७ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, श्री शैलेश बलकवडे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक, शेषराज मोरे तसेच पोलीस अंमलदार महेश खोत, संजय इंगवले, अमर शिरढोणे, सुरज चव्हाण, संजय पडवळ, संतोष पाटील, राजेंद्र वरंडेकर तसेच सायबर पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार सचिन बेंडखळे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

|