Header Ads Widget


शिक्रापूर परिसरात गोळीबार व जीवे मारण्याचा प्रयत्न, आरोपीस ४८ तासात अटक.

 

LiveNationNews Bulletin

पुणे ग्रामीण, दि. ०६/०२/२०२३.
दिनांक 31/01/2023 रोजी रात्री 08:30 वाजताचे सुमारास मौजे शिक्रापूर ता.शिरूर, जि.पुणे येथील चाकण चैक येथे रस्त्याचे कडेला दोन व्यक्ती थांबले असताना एका अनोळखी इसमाने त्याचे मोटारसायकलवर येवुन काहीएक कारण नसतांना त्याचे मोटारसायकलची लाईट डोळयावर का दाबली असे विचारलेचे कारणावरून मोटारसायकल वरील अनोळखी इसमाने चिडुन जावुन थांबलेल्या इसमांवर शिवीगाळ करून, दमदाटी करून थांब तुला संपवतो असे म्हणुन स्वतःचे कंबरेचा पिस्टल काढुन एक राउंड खाली फायर करून नंरत पुन्हा पिस्टल जीवे मारणेच्या उद्देशाने एकाच्या कपाळावर रोखुन धरला होता. सदर गुन्हा घडले नंतर फिर्यादीवरून शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. कलम 307, 504, 506 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3(1), 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन श्री.अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, यशवंत गवारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली प्रमोद क्षिरसागर पोलीस निरीक्षक, शिक्रापुर पोलीस ठाणे यांनी तपासाची सुत्रे फिरवुन सोबतचे स्टाफला गुन्हा घडले ठिकाणचे सी.सी.टी.व्ही.फुटेजची बारकाईने तपासणी करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे गुन्हा घडले ठिकाणचे आजुबाजुचे रोडलगत असणारे सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे तसेच गोपणीय बातमीदारांचेमार्फत सदर गुन्हा कोणी केला असलेबाबत माहिती मिळाल्यानंतर सदर आरोपीस 48 तासाचे आत अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीकडुन गुन्हयात वापरलेले पिस्टल व सहा जीवंत राउंड तसेच एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच गुन्हयाचे ठिकाणावरून एक पुंगळी जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीकडे अधीक तपास केला असता आरोपी हा पुर्वी रांजणगाव एम.आय.डी.सी. मध्ये माथाडी कामगार म्हणुन काम करीत होता. तसेच सध्या तो महाराष्ट्र राज्य श्रमीक माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियन या संघटनेचा महाराष्ट्र राज्य कमीटी अध्यक्ष म्हणुन काम करीत आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधीक तपास अमोल खटावकर, पोलीस उप निरीक्षक व अतुल पखाले, पोलस नाईक हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही श्री.अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मितेष घट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, यशवंत गवारी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली प्रमोद क्षिरसागर, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर पोलीस ठाणे, सहा.पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, रणजित पठारे, सहा.फौज पानसरे, पो.हवा/होणमाने, अमोल दांडगे, सचिन होळकर, चंद्रकांत काळे, पो.ना/चितारे, विकास पाटील, पो.कॉ/देवकर, किशोर शिवनकर, निखिल रावडे, लखण शिरसकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

|