Header Ads Widget


मटका जुगार अड्डयावर छापा टाकुन 25 इसमावर कारवाई करून 66,630/- रू.चा मुद्देमाल जप्त.

 

LiveNationNews Bulletin

पुणे शहर, दि. ०६/०२/२०२३.
दिनांक 03.02.2023 रोजी घोरपडीगाव, वानवडी पुणे परीसरात पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली.
सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे, शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीर मटका जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्यानेे 24 इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून मटका जुगारातील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकुण 66,630/- रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व एक पाहिजे आरोपी अशा 25 इसमांविरूध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम 12 (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री.रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री.संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणेे, श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.

Post a Comment

0 Comments

|