Header Ads Widget


वाढे फाटा येथे बेछूट गोळीबार करुन खून केल्याचा गुन्हा उघड.

सातारा, दि. ०६/०२/२०२३.
दि.२४/०१/२०२३ रोजी रात्रौ ००.३० वा.चे. सुमारास वाडे गावचे हद्दीत पुणे कोल्हापूर रोडवर सर्व्हीस रोड लगत मयत अमित आबासाहेब भोसले रा. शुक्रवारपेठ सातारा यांचेवर अज्ञात इसमांनी मोपेड मोटार सायकलवर येवून गोळीबार करुन त्यांचा खुन केला. त्याबाबत फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन सातारा तालुका पोलीस ठाणे येथे भादयिक ३०२, ५०६ (२), ३४ सह भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३), १३५ गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात लक्षात घेवून श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. मोहन शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून सदरच्या गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके सातारा तालुका पोलीस ठाणे यांना दिल्या. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्यांचे अधिपत्याखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गजें, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे व व पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके सातारा तालुका पोलीस ठाणे यांनी सातारा तालुका पोलीस ठाणेकडील तपास पथक तयार केले. स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकाने घटनास्थळावर चौकशी केली तसेच तांत्रिक पुराव्यांचा शोध घेवून मयताच्या कुटूंबाकडे व इतर साक्षिदार यांचेकडे चौकशी केली असता ६ आरोपी निष्पन्न केले त्यामधील १ विधी संघर्षग्रस्त बालक यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
नमुद आरोपींचे ठावठिकाण्याबाबत माहिती प्राप्त केली असता ते गुन्हा घडलेपासून फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडलेपासून त्यांचा सातारा, पुणे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, लातुर, अलिबाग, इंदौर, उज्जैन-राज्य मध्यप्रदेश अशा वेगवेगळया जिल्हयात तसेच गोवा राज्यात शोध घेतला. सपोनि रमेश गर्जे व पोउनि अमित पाटील यांची दोन स्वतंत्र पथके त्यांच्या मागावरच होते. दरम्यान त्यांचे वास्तव्य असलेल्या वेगवेगळया ठिकाणी बातमीदार तयार करुन त्यांना पकडण्यासाठी कौशल्यपूर्ण प्रयत्न केले. दरम्यान दिनांक ३ फेब्रुवारी २०१३ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत नमुद आरोपी हे गोवा येथे असल्याचे खात्रीलायक बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. नमुद आरोपी हे स-हाईत असल्याने व ते त्यांचे लोकेशन सातत्याने चेंज करीत असल्याने व स.पो.नि. रमेश गर्जे व तपास पथक गोवा येथे पोहोचण्यास दोन तीन तासाचा अवधी होत असल्याने तातडीने हलचाल करण्यासाठी श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी सदरची माहिती श्री. निधीन वाल्सन, पोलीस अधीक्षक उत्तर गोवा यांच्या मदतीने ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी मयताच्या पत्नीकडुन सुपारी घेवून सदरचा खुन केल्याचे सांगीतले. त्यानंतर मयताची पत्नी तसेच १ विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेवुन मयताच्या पत्नीकडे विचारपुस केली असता तीने तीचा मयत पती हा बाहेरील स्त्रीयांशी अनैतिक संबंध ठेवून तीला मारहान करीत होता म्हणुन तीनेच त्याच्या खुनाची सुपारी दिली असल्याचे सांगीतले आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. मोहन शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर. उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, संतोष पवार, अतिश पाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, निलेश काटकर, गणेश कापरे, मोहन पवार, मयुर देशमुख, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे, अनिकेत जाधव, सुशांत कदम व सातारा तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार राजेंद्र बजा दादा परिहार, नितीराज थोरात, सतिश पवार, सचिन पिसाळ, रायसिंग घोरपडे, राहूल राऊत यांनी सदरची कारवाई केलेली आहे.
गुन्हयाचे घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना गोपनीय बातमीदार, CCTV फुटेज तसेच तांत्रीक विश्लेषनाचे आधारे आरोपींची माहिती काढून सलग १० दिवस आरोपींचा पाठलाग करून त्यांना जेरबंद करण्याची कौशल्यपूर्ण कामगिरी करणा-या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments

|