Header Ads Widget


युवकाचे अपहरण करून त्याचा खुन केलेले आरोपी ३६ तासात रत्नाफगिरी येथून जेरबंद

 

LiveNationNews Bulletin

सातारा, दि. ०६/०२/२०२३.
02 फेब्रुवारी 2023 रोजी सांयकाळी 05.00 वा.चे सुमारास मौजे चांदक ता वाई गावचे हद्दीतुन अभिषेक रमेश जाधव रा. खानापूर ता. वाई याचे 03 इसमांनी अपहरण केले होते. त्याबाबत तो ज्यांचेकडे वेल्डींगचे कामास होता त्यांनी त्याचे अपहरण केलेबाबत पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरुन कलम ३६२,५०६,३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
दरम्यान सदर अपहरण झालेल्या मुलाचा तसेच आरोपींचा भुईंज तसेच वाई पोलीस ठाणेच्या अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचे हद्दीत शोधत असताना २ फेब्रुवारी २०१३ रोजी रात्री ०१.३० वा. चे सुमारास तो शेंदुरजणे ता.वाई गावचे हद्दीत जखमी अवस्थेत मिळून आला. त्यास उपजिल्हा रुग्नालय वाई येथे उपचारकमी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारांसाठी सातारा येथे पाठवले, सातारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना अभिषेक हा पहाटे ०५.०० या दरम्यान मयत झाला होता.
सदरचा प्रकार अतिशय गंभीर असल्याने पोलीस अधिक्षक सातारा श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सातारा श्री. बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई श्रीमती जानवे खराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव श्रीगणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, भुईंज पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक रमेश गर्जे तसेच भुईंज पोलीस स्टेशन व जिल्ह्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट दिली. मा. पोलीस अधिक्षक सातारा तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सर्व तपास पथकास गुन्हा उघडकीस आणणेच्या सूचना दिल्या.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा सातारा तसेच पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने गुन्हयाचा जलदगतीने तपास करताना येणारे जाणारे सर्व रस्ते / आरोपींच्या जाण्या येण्याच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून सर्वप्रथम गुन्ह्यातील अज्ञात 03 आरोपी निष्पन्न केले. आरोपींच्या ठावठिकाण्याबाबत माहिती प्राप्त केली असता संशयीत आरोपी हे पोलादपूर मार्गे कोकणात गेल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे तपास पथकाने गुन्हा घडलेल्या रात्रीपासुन रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात आरोपींचा शोध घेतला असता दिनांक ३ फेब्रुवारी २०१२ रोजी रात्री सदर आरोपी हे दापोली परिसरात असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. स्थानिक गुन्हे शाखा तसेच भुईंज पोलीस स्टेशनच्या संयुक्त तपास टीमने दापोली परिसरात संपूर्ण रात्रभर कसोशीने शोध घेतला. यानंतर दिनांक ४ फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी गुन्हयातील 02 आरोपी तसेच विधीसंघर्ष बालक हे दापोली पोलीस स्टेशन हददीतील कर्दे बीच परीसरात दिसुन आल्याने त्यांना पकडण्यात सदर पथकास यश आले असून गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे करीत आहेत.
श्री. समीर पोलीस अधीक्षक, सातारा श्री.बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती शितल जानवे खरादे उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग, श्री. गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव, बी. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे या सातारा श्री. बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन, रमेश गर्जे सपोनि भुईंज पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरिक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक राजदीप भंडारे, भुईंज पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार विकास गंगावणे, शंकर घाडगे, आनंदा भोसले, जितेंद्र इंगुळकर, प्रशांत शिंदे, सचिनल नलावडे, अतुल आवळे, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, संजय गायकवाड स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार तानाजी माने, शरद बेबले, मुनीर मुल्ला, प्रविण फडतरे, गणेश कापरे, अमोल माने, अजित कर्णे, प्रविण पवार, स्वप्नील दौंड, स्वप्नील माने, रोहित निकम, सचिन ससाणे, धिरज महाडीक यांनी सदरची कारवाई केली आहे.
अशा प्रकारे गुन्हा घडल्यापासून ३१ तासाचे आतमध्ये तपासाची चक्रे जलद गतीने फिरवुन कठोर परिश्रम करून एका संवेदनशील गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments

|